Sunday, December 25, 2022

स्पर्शकळप...


तुझिया आठवणींचा
पहा किती दरारा
क्षण ही निघत नाही
ध्रुवदिशेस भरारा

रातीच्या भिंतीआडूनी
जात्यावर कोण दळते?
मनातली माहेरवाशिण
जणू बापकुटीस हळहळते

अश्रुंनी तलाव सजतो
फुलतात मनात कमळे
पद्मगंधी एकोप्यातुन
मनात पुकार उमळे

रक्ताच्या पल्याडाहून
पुकारती तुला हाडे
पुसट कशाला व्हावेत
प्रेमभुलीचे धडे?

ख्रिस्तसुळावर येती
तुझ्या हाकांच्या वेणा
मी तळव्यावर सजवतो
आठवांच्या सुळखुणा

रंग कोणता असा
मी तमात कालवावा?
तुझ्या स्पर्शाचा कळप
नक्षत्रातुन बोलवावा....

प्रताप
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२५.१२.२०२२





No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...