Saturday, December 31, 2022

चंद्रांतर.....


सांजबुडीच्या वेळी
एकांत विरळ विरतो
मी चंद्र एकला होऊन
तुझ्या घरावर फिरतो

पानाची जाळी शुष्क
अनाथ पडते रानी
रात मुक्याने गाते
नक्षत्रांची चांदणगाणी

चांदसखा मी होऊन
असतो उजाड जागा
शब्दांचा आत्मा जळतो
होऊन वातीमधला धागा

शब्दांचे मनोरथ माझ्या
उजेड होण्या जळते
दुःख आवेगी त्यांचे
तमास तुझ्या का कळते?

कवितेस या माझ्या
दे ना चांदण काया
दे पांघरून तिजवर
तुझी मलमली माया

शब्दास भिडु दे माझ्या
तुझ्या आत्म्याचे मन्वंतर
मी सांधून घेईन सत्वर
चंद्राचे सुदुर अंतर....

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
३१.१२.२०२२






No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...