Thursday, December 29, 2022

रितेपण


मी होतो रिता जरासा
घेवून तुझे दुरावे
पानगळीने जैसे येथे
बहरफुलास झुरावे

मी करू कशी आवेगी
आठवांची धुळधाण?
उतरून द्यावे तरूने
जसे शुष्क वाळके पान

मी फुल कोणते लगडू
झाड जणू झुंबरते
गाय जणू पान्हावली
सांयघडी हंबरते

मी गीत कोणते लिहू
जे तुला भारून जाईल
चांद कोणता शोधू
जो तुला धारून येईल

मी हाक कसली देवू
होईल तुला की व्याकुळ
बासरीने मोहरून जाईल
मग कृष्णसखीचे गोकुळ

मी त्यागु कसा मोह
होऊ कसा मी सन्यांशी
भरू कसे रितेपण
जे साचते हृदयापाशी...?

प्रताप
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२९.१२.२०२२


No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...