Saturday, December 31, 2022

हाकेची आकाशगंगा


काळ चालतो आहे
....अनादी पासून
अनंता पर्यंत.....
आपल्या घटिक गतीने
एकेक युगांचे
तो घेतोही विसावे क्षणीक..
आपले चक्र
स्तब्धवून...!

त्याची सहयात्री
म्हणून तुला दिलेली
माझी हाक
ती ही चालते आहे
अनंताचा प्रवास...
अनादी पासून
अनंताकडे...

त्या माझ्या हाकांचे
हरयुगीन काफिले
संचित करून
काळ बनवतो आहे
एकेक आकाशगंगा
आणी पसरवतो आहे
प्रदिर्घ अंतराळात
.... हे अंतराळ असेच
विस्तारते आहे माझ्या
हाकेगणीक....

आणी तु......
तुझ्या नजरपशात
येऊ एवढ्याच
या आकाशगंगेतील
तारकांचे लावते आहेस
अन्वयार्थ
कसले बसले नक्षत्र बनवून...
कधी शततारका,
कधी विशाखा,
कधी हस्त,
कधी चित्रा
कधी रेवती
कधी धनिष्ठा
असे काहीबाही
नामाभिधान देत..

या हाकांच्या
अनंत आकाशगंगा
कधी पाहशील तु
ओंजळीत घेऊन एकत्र?

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१.१.२०२३







No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...