Wednesday, December 14, 2022

दिवेलागणी


दिवेलागणी वेळी
मी काही मागत नाही
अंतःपुरीच्या आतले
गाव त्यागत नाही

गावाच्या वेशीवरती
गोरजधुळ उडते
दुःख कुणाचे हसरे
मनात मुक रडते

देव्हा-याला कसले
प्रश्नांचे पडते कोडे
संन्यस्त भावनेवरती
उडती मोहाचे शिंतोडे

मी मोहही त्यागत नाही
ना होतो मी संन्याशी
हात पसरतो मिटले
तुझ्या काळजापाशी

साचल्या अंधार वेळी
पेटव सांज दिवा तु
दे हृदयास माझ्या यावेळी
 कवडसा एक नवा तु!

○ प्रताप ○
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१४.१२.२०२२






No comments:

Post a Comment

तोडून...?

गोकुळ निघाले मथुरा अनाथ झाल्या गायी राधा हृदय चालले कृष्ण दिशेने पायी येईल परतून कान्हा देईल हाक हासरी? की थेट वृंदावनी मूक्ती तोडून प्राणप्...