Sunday, December 11, 2022

अवचित सुगंधी होणे


उकलते जरासे
मनात साचलेले
ते अक्षर अंधूकसे
पुसटसे वाचलेले

लयीत पाताळाच्या
चांदण्याचे गात गाणे
उलटून जाती एकेक
मिटल्या पुस्तकाची पाने

हो ना तु ही अनोखी
कविता सुचलेली
काट्यामधूनी अलगद
फुलोरा वेचलेली

असु दे हातास या
सुगंधाचे तुझ्या देणे
जाणू दे मलाही
अवचित सुगंधी होणे..!

○ प्रताप ○
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
११.१२.२०२२






No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...