Thursday, December 1, 2022

विसरलेल्या लोककथा

स्वप्नभुमीत रूजते
आठवणींचे रंगीत बिज
अवकाशाच्या चांदणीला
देवून व्याकुळ निज

थवा ढगांचा अंधूक
चांदण्याची लोचने
स्वप्नांचे धागेदोरे
दिठीतुन व्यग्र वेचणे

बंदी त्या पावलांना
श्रृंखला कशी तुटावी?
आसक्तीच्या तळातली
निर्मोहकता कशी सुटावी?

घोड्यांचे थिजले डोळे
हरिणगतीला भिनले
मी वस्त्र कोणते ऐसे
अवघड पळात विणले?

या स्वप्नधाग्यांचे रंगीत
विणलेले भरजारी वस्त्र
वास्तवाच्या मयसभेत या
भाव माझे निर्वस्त्र

काय भारून सांगु
केवड्याच्या मी व्यथा?
तु जपशील ना माझ्या
विसरलेल्या लोककथा?
○ प्रताप ○
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२.१२.२०२२










No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...