Sunday, December 25, 2022

प्रकाश याचना


अंतरीचे तुफान
तरीही जळतो दिवा
ओळखुन सरावलेली
आठवणींची हवा

हवेस चेटूक नित्य
ती मंद गतीने वाहे
दिवा गाभा-यातला
दिपमाळ उसासून पाहे

तमास कसले गुज
नित्य मी करावे?
वात मनाची माझ्या
जळण्यास सरावे

मी काजळीच्या वाटेवरती
स्वप्न लपवू पाहतो
विझल्या वातीवरती तयांचा
काळा डाग राहतो

पुन्हा तिथुनच जळणे
वात थकत नाही
जळणे तिचे अंधारी
चुकता चुकत नाही

का थरारतो नित्य
तुझ्या देव्हा-यातील दिवा?
घे विचारून त्याला...
माझ्या वातीचा प्रकाश हवा?

प्रताप
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२५.१२.२०२२



No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...