Monday, December 26, 2022

निशीगंधी तळवे


या पानसळसळी वेळी
मी स्तब्ध राहू कसे?
की ओटीस तुझ्या बिलगवू
रानातली मोरपिसे?

शांत तळ्याच्या काठी
मी करतो मुक धावा
गीत मनाचे माझ्या
चालते तुझ्या गावा

घे भेट त्या गीताची
शब्द कुशीला घेवून
घे तुझेच रूप बिलोरी
शब्दामधले पाहून

हा अनंतमुखी शोध तुझा
मी गीत पेरतो हळवे
दे निशीगंधास या अर्पुण
तुझे आसुस तळवे!!


प्रताप
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२६.१२.२०२२








No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...