Wednesday, December 14, 2022

चांदणधाव


नाव तुझे उमटावे
आत्म्याच्या भिंतीवरती
हे चंद्र मनातील माझ्या
अवकाश कडेवर झरती

झरल्या चंद्राखाली
ओल चंदेरी पसरे
पंख चकोरी आर्त
माळावरती घसरे

निनाद त्या पंखाचा
धरणीचा हो दुभंग
नावातील अक्षरांचा
हो हळवा एक अभंग

अभंग शिलेतुन मग मी
पुन्हा कोरावे तुझे नाव
हृदयाच्या नक्षत्र मिठीला
चांदण्याने घ्यावी धाव....


○ प्रताप ○
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१४.१२.२०२२






No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...