Friday, December 30, 2022

रावा हाक


हिरवे रावे गातील
पर्णहीन तरूंची गाणी?
किती ॠतु सोसावी
ही बहराची मनमानी?

पहाडांच्या काठावरती
धुके उभे का असते?
शिखराच्या माथ्यावरती
दुःख एकले बसते

मी हाक कशाला देवू
दरीत दुःख घुमते
झाडांच्या सावलीचे
करडे मन दमते

शिळ देत नाही
असला कसला रावा?
मलाच समजत नाही
तुझा मृगजळी कावा

मी नभाच्या कोप-याला
वचन कशाला देवू?
तुझ्या खिडकीतला रम्य
तारा कशाला होवू?

तु नभ बनशील तेंव्हाच
मी बनेन सप्तर्षी तारा
आणी धारेनही रंग
तुझा चमकणारा.....

प्रताप
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
३१.१२.२०२२










No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...