Saturday, December 24, 2022

आभासातल्या उरभेटी


आत्मे विखुरले शब्द
डोंगरमाथी पेरणी
हंगामात का लगडते
फुलास माझ्या झुरणी?

पडवीत वाळके पान
आणतो कुठुन वारा?
दारात शिशिर रेंगाळे
पानगळ बहरणारा

मी पान कोणते वेचू
हिरव्या बहर कथेचे?
की निनाद टिपून घेवू
पडत्या दव व्यथेचे?

धवल दिशेला धुके
उज्वल त्याचा रंग
मी दिर्घ कुशीला घेतो
एकांताचा संग

दुर कुठे ती बासरी
मुकमुक्याने वाजे
राधेच्या लोचनाला
दव शुक्ल साजे

पायरवाचे ध्वनी
पुसट मला का वाटती?
अंधार साचला असता
गाभारी दिवे का पेटती?

ये! दिव्याच्या कवडशा
अंधार बनाच्या दाटी
स्पंदनास ऐकु याव्या
आभासातल्या उरभेटी...

○ प्रताप ○
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२५.१२.२०२२
















No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...