Tuesday, May 3, 2022

सुबक भुल...

चेहरा मी तुझा
कवितेतुन सांधावा
जिव माझा रूपक
शब्दांनी बांधावा

अनावर प्रतिमांची
हो सुबक मांडणी
शिर्षकात उगवून यावी
तुझ्यातली चांदणी

हर एक शब्दाने
प्राचिन ॠचा व्हावे
कवितेत रूजलेले
मी तुला पहावे

ही रूजवात अशी
पुन्हा अंतरी फुलावी
कवितेस तु, तुला कविता
नित्य निरंतर भुलावी...
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
३ मे २०२२

No comments:

Post a Comment

तोडून...?

गोकुळ निघाले मथुरा अनाथ झाल्या गायी राधा हृदय चालले कृष्ण दिशेने पायी येईल परतून कान्हा देईल हाक हासरी? की थेट वृंदावनी मूक्ती तोडून प्राणप्...