Tuesday, November 8, 2022

कर्ण...


माझ्या अंतर्मुख असण्याला
तुझे संदर्भ नसण्याचे
मी गहिरे दुःख धुळाक्षरी
झुळुकीगणीक पुसण्याचे

मी भास गुढ असंभाव्य
मी उगाच उगवला तारा
अंधार तुझ्या पदराचा
दाटून अंतरी ढळणारा

तु अप्राप्य चांदणमंडल
नभी अवचित उगवणारे
अंधार दाटल्यावेळी
नवआस तगवणारे

तजेलदार फुलांचा मी
राजवर्खी असहज वर्ण
तुझ्या आठवांच्या चाकांशी
झगडणारा मी कर्ण....
प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
८.११. २०२२





No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...