Friday, November 18, 2022

ग्वाही


अपुर्णतेचे भान घेवून
पुर्णत्व गाठताना
वाहत्या शब्दाखाली
भाव बनून गोठताना

क्षणभर थांब .....
रिकामी ओंजळ पसर
होऊ दे शब्दावर
भावकल्लोळी असर

त्यांना तोल हृदयी
दुरवरून कवितेस पहा
तिच्या एकल आत्म्याला
माझा देवचाफा वहा

घे सुगंधवा-याचे ठसे
कवितेला रंग दे
आकारहीन आठवणींना
तुझे भाव अंग दे

होवू दे शब्दांना
तगमगीचे स्पर्श
घे रेखाटून जिवावर
सृजनाचे अस्पर्शि हर्ष

कवितेच्या अस्तित्वाला
नकोस विचारू काही
भाव देतील आपोआप
समर्पणाची आर्त ग्वाही

◦•●◉✿ प्रताप ✿◉●•◦
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१८.११. २०२२









No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...