Sunday, November 20, 2022

युक्ती


चांदण उगवतीच्या मुहूर्ती
डवरती शब्द फुले
हृदयाच्या हिंदोळ्यावर
तुझे आभास झुले

सुर्याचे काळीज केशरी
धरतीच्या कुशीत चालले
ढगांच्या अंतःकरणाला
कोण गुलाल लावले?

ओढ कसली दाटते
निनादत असता हाक
चेह-यास तुझ्या का यावी
नजरेची माझ्या झाक

असल्या व्याकुळ वेळी
अस्पर्शि कसा राहू?
भुगर्भातील झ-यासम
कुठपावेतो मुक वाहू?

दे ना उगम मजला
मिळू दे एकदा मुक्ती
देवून टाक या प्रवाहास
सागराची व्याकुळ युक्ती..
॰प्रताप °°
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२०.११.२०२२





No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...