Thursday, November 17, 2022

शिणला


तुझ्या सावलीचे गाव
उजेडाचे मंद दिप
मी आतल्या खोल तुला
का शोधावे समीप?

तुझ्या सहवासाचे आभास
वास्तवातले दुरावे
हवा घेवूनी कुशिला
किती किती मी झुरावे?

तुझ्या मनातले गीत
शब्द यावा कसा ओठी?
कसे घेईल आभाळ
धरतीच्या गाठीभेटी?

तुझ्या घराच्या वाटा
चोरती का असे अंग?
का बांधतो हा जिव
तुझ्या वाटेचा हा चंग?

तुझ्या जिवाची काहिली
आग पेटते मनाला
उसासून एकोप्यात
जिव अभागी शिणला....

◦•●◉✿ प्रताप ✿◉●•◦
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१७.११. २०२२







No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...