Friday, November 18, 2022

काय...?


मी काय अर्पावे तुला
अंतरातले माझे?
विरून जाईल म्हणजे
हृदयावरचे ओझे

मी काय व्हावे असे
तुझ्या समीप असणारे?
मिटल्या डोळ्यांनाही
सुस्पष्ट दिसणारे

मी काय घडून यावे
तुला हवे वाटणारे?
एकांतघडीच्या वेळी
अनाम मनी दाटणारे

मी काय असावे असे
जे तु प्रार्थनी मागावे?
झोपाळल्या रातीतही
चांदण्याने जागावे.....

✿ प्रताप ✿
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१८.११. २०२२

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...