मी टिंब टिंब जोडत
येतो रेखत रेषा
तु धुसरत पायखुणा
खोडत निघते भाषा
मी एक एक शब्दांचे
कसे बांधू सेतु?
सांधू कसे तुझ्या मनाचे
अरण्यकी गर्त हेतू?
सारून सारी मृदा
वृक्ष कसा उगवावा?
बहर मनातील एकट
असा कसा तगवावा?
नकोस बोलू काही
सारे मजला कळते
अंधार दाटला असता
दुःख एकले जळते
तु नकोस घालू बांध
धारेस मुक्त वाहू दे
घे सामावून माझे असणे
सागरा स्थिर राहू दे
सागर निघत नाही
तो सोसत एकला उभा
नदीस विलीन होण्याची
देत मुक मुभा
नकोस मोडू दिशा
रस्ता भेटत नाही
या भांबावल्या रातघडिचे
तुला काही वाटत नाही...??
प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१०.११. २०२२
येतो रेखत रेषा
तु धुसरत पायखुणा
खोडत निघते भाषा
मी एक एक शब्दांचे
कसे बांधू सेतु?
सांधू कसे तुझ्या मनाचे
अरण्यकी गर्त हेतू?
सारून सारी मृदा
वृक्ष कसा उगवावा?
बहर मनातील एकट
असा कसा तगवावा?
नकोस बोलू काही
सारे मजला कळते
अंधार दाटला असता
दुःख एकले जळते
तु नकोस घालू बांध
धारेस मुक्त वाहू दे
घे सामावून माझे असणे
सागरा स्थिर राहू दे
सागर निघत नाही
तो सोसत एकला उभा
नदीस विलीन होण्याची
देत मुक मुभा
नकोस मोडू दिशा
रस्ता भेटत नाही
या भांबावल्या रातघडिचे
तुला काही वाटत नाही...??
प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१०.११. २०२२
No comments:
Post a Comment