Saturday, November 26, 2022

ओथंब...


मी वृत्त कोणते घेवू
शब्द तुझे गुंफाया
चांदणे तुझ्या छवीचे
या रातीवर शिंपाया

भाकितांची लागवड मी
करू कशी आभाळी?
हे वर्तमान हुरहुरीचे
धारू कसे मी भाळी?

डोहाच्या काठावरती
दंतकथा हळु विसावते
हे कोण असे काठांना
लाटातुन फसवते...?

संधेला वाणी नसते
त्यावेळी कोण गाते?
चांदण्याचे वस्त्र रूपेरी
चंदेरी तम होते

घरटे रिते लटकते
एकट झाडावरती
पाखरजोडीच्या चोची
ॠचा पहा पाझरती

त्या पाझर ॠचेखाली
मी शब्द माझे भिजवतो
डोहाच्या काठावरती
मी ओथंब का सजवतो?

○ प्रताप ○
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२६.११.२०२२




No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...