Saturday, November 19, 2022

फुलांचे हसणे...


खालमानेने गळताहेत फुलं
हा निरव बहर फुलोरा
गंध उडे आसमंती
शोधत वेल सहारा

झळाळतो रंग कसला
गळतीच्या वेलीखाली
मातीतल्या पाकळ्यांना
नसते कोणी वाली

पायदळी हे कसले
सांडून जाते लेणे
दुःख घेवून अंगी
हुरहुरनारी पाने

थरथरणारी वेल आणीक
झरझरणारे वारे
व्याकुळ निरोप घेती
वेलीवरून सारे

सांडल्या पाकळ्याचे
मी घेवून सुगंध उसने
शोधत असतो वेलीवर
फुलांचे निष्पाप हसणे...

॰॰प्रताप °°
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१९.११.२०२२




No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...