अंधार ओसंडून सरतो
समई जळत असता
मी तरीही अडून असतो
सारे कळत असता
स्तब्ध हवा तरीही
चाहूल तुझी अंतरी
आत्म्याचे राऊळ हे
कोण पुजारी मंतरी?
हा कोणता विधी
अन् कोणती आराधना?
जिवाआड जतावी
तुझी खोल वेदना....
मोतियाच्या आभाळाला
चांदण्याचे शुभ्र चटके
मी आभाळ कसे धरावे
मुठीत माझ्या भटके?
मी हात उंचावले माझे
दे फुलांचे दान मजला!
मागणीच्या आभासाने
तुझा चंद्र बघ थिजला!
○ प्रताप ○
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२८.११.२०२२
समई जळत असता
मी तरीही अडून असतो
सारे कळत असता
स्तब्ध हवा तरीही
चाहूल तुझी अंतरी
आत्म्याचे राऊळ हे
कोण पुजारी मंतरी?
हा कोणता विधी
अन् कोणती आराधना?
जिवाआड जतावी
तुझी खोल वेदना....
मोतियाच्या आभाळाला
चांदण्याचे शुभ्र चटके
मी आभाळ कसे धरावे
मुठीत माझ्या भटके?
मी हात उंचावले माझे
दे फुलांचे दान मजला!
मागणीच्या आभासाने
तुझा चंद्र बघ थिजला!
○ प्रताप ○
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२८.११.२०२२
No comments:
Post a Comment