येते असे काही बागडत
मनाच्या रस्त्यावरती
ठाण कोरड्या नयनांनाही
जणू हुरहुर भरती
नसतो सोस तरीही
इच्छा असते दाटून
क्षणात निर्वाताच्या
जाते क्षणभर वाटून
तु यावे कुशीच्या गावा
हिरवा माळ व्हावा
तुझ्या तल्लीन आळवणीत
जिव माझा टाळ व्हावा
सुर भिडावे आकाशी
अवघेची भरून यावे
दुरवरचे एकट पाखरू
पुन्हा फिरून यावे
द्यावी त्याने खुशाली
तुझ्या गोंदण खुणांची
मी व्हावे एक कविता
तुझ्या व्याकुळ मनाची
मी टिपून दव घ्यावे
तुझ्या गवत पात्याचे
तु अनूभवावेत रंगीत
ऋतु आपल्या नात्याचे
मी फुल व्हावे सुगंधी
तुझ्या झाड कुळाचे
आणी चैतन्य व्हावे
गढल्या खोल मुळाचे...
◦•●◉✿ प्रताप ✿◉●•◦
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१४.११. २०२२
मनाच्या रस्त्यावरती
ठाण कोरड्या नयनांनाही
जणू हुरहुर भरती
नसतो सोस तरीही
इच्छा असते दाटून
क्षणात निर्वाताच्या
जाते क्षणभर वाटून
तु यावे कुशीच्या गावा
हिरवा माळ व्हावा
तुझ्या तल्लीन आळवणीत
जिव माझा टाळ व्हावा
सुर भिडावे आकाशी
अवघेची भरून यावे
दुरवरचे एकट पाखरू
पुन्हा फिरून यावे
द्यावी त्याने खुशाली
तुझ्या गोंदण खुणांची
मी व्हावे एक कविता
तुझ्या व्याकुळ मनाची
मी टिपून दव घ्यावे
तुझ्या गवत पात्याचे
तु अनूभवावेत रंगीत
ऋतु आपल्या नात्याचे
मी फुल व्हावे सुगंधी
तुझ्या झाड कुळाचे
आणी चैतन्य व्हावे
गढल्या खोल मुळाचे...
◦•●◉✿ प्रताप ✿◉●•◦
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१४.११. २०२२
No comments:
Post a Comment