धुक्यातल्या रानवा-याला
का वाटे केविलवाणे?
अज्ञाताचे हात फिरती
त्यावर मग प्रेमाने
अशा सांजशेजेला
लगडती चंदनफुले
मी हात माझे करतो
कृपाळू मुहूर्तावर खुले
पान एक पडते
आवाज त्याचा कसला?
दुर कुणाच्या चाहुलीचा
मोर रूसून बसला?
पायरवाची लाली
भुईत माझ्या मुरते
सांज सरता तिळतिळाने
धुक्यात रात उरते
उरल्या रातीचे शिल्प
दिसते असे का भग्न?
उदास माझे गोकुळ
राधा कुठे गं मग्न?
सुरावटीचे सुरवंट
फुलपाखरू बनते
वेलीच्या आत्म्यावरले
फुल उसासून शिणते....
○ प्रताप ○
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२९.११.२०२२
का वाटे केविलवाणे?
अज्ञाताचे हात फिरती
त्यावर मग प्रेमाने
अशा सांजशेजेला
लगडती चंदनफुले
मी हात माझे करतो
कृपाळू मुहूर्तावर खुले
पान एक पडते
आवाज त्याचा कसला?
दुर कुणाच्या चाहुलीचा
मोर रूसून बसला?
पायरवाची लाली
भुईत माझ्या मुरते
सांज सरता तिळतिळाने
धुक्यात रात उरते
उरल्या रातीचे शिल्प
दिसते असे का भग्न?
उदास माझे गोकुळ
राधा कुठे गं मग्न?
सुरावटीचे सुरवंट
फुलपाखरू बनते
वेलीच्या आत्म्यावरले
फुल उसासून शिणते....
○ प्रताप ○
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२९.११.२०२२
No comments:
Post a Comment