Wednesday, November 9, 2022

एक हसरे...

शुभाशिषी फुलपाखरू
रमते तुझ्या फांदी
कुठल्या फुलबहराची
पंखात निनादे नांदी

धुंद कुंद कळीतले
सोने कसे जतावे?
पापण अस्तरातले
स्वप्न अनाहूत फितावे

लागे जिवास छंद
अश्रुबिंदूच्या तळी
काळजावर उमलताना
तुझ्या भासाची खळी

मन दमून शोधते
तुझ्या फांदिचे आसरे
मग स्वप्नांचे फुल उमलते
मनात एक हसरे

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
९.११. २०२२


No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...