Saturday, July 11, 2020

जग थिजून येईल...



रान भिजले होते
हवा कुंद होती
मातीला कसली
आली धुंद होती

पाऊस थिजला होता
ढग स्तब्ध होते
ओल दाटून येणे
सांजेचे प्रारब्ध होते

तु होतीस
सारे होते
सोबतीला आपल्या
ऊधाण वारे होते

हिरवाईत सजलेले
एक शिवार होते
भिजल्या घराला
भिजले आवार होते

हवा आली
ढग सुटले
वादळात झाड
पारिजाताचे तुटले

पाण्यात पडला
फुलांचा सडा
जात्या ढगांनी दिला
चिखलाचा धडा

आता पाऊस येतो
ढग थांबत नाहीत
ओल नसलेले पाऊस ही
उगाच लांबत नाहीत

मजलदरमजल करत
पाऊस निघून जातो
इंद्रधनू सुकलेला
मी मुक बघून घेतो...

आण ! तो जुना पाऊस
सारे भिजून जाईल
तुझ्या तनूवरील थेंबात
जग थिजून येईल...
♡pr@t@p♡
"रचनापर्व"
11/7/2020
BLOG#prataprachana.blogspot.com

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...