भेदून ढगाचे अस्तर
कवडसे हो प्रकाशी
पंखानी चुंबुन घेती
पाखरे आकाशी
दुव्याचा रंग ओंजळीत
मी झेलून अलगद धरतो
रंगाचा आत्मा निरंग
नयनात संयत भरतो
झोळीच्या व्याकुळ तळास
आकाश दान निळे देते
गवतावर झरल्या थेंबाचे
खोल तळे होते
ढगांच्या आत्म्यात मी
शोधत राहतो ओल
संपृक्त झाल्या मातीला
पाण्याचे कसले मोल?
पाखरे कोणाचा निरोप
घेवून आकाशी फिरती?
पाताळाच्या खोल आतुन
आस उमडते वरती
आभाळाचा सांधा
कवडशाशी बिलगतो
स्वप्नांचा थवाही मग
अवकाशातुन विलगतो
मी वाट चुकल्या थव्यांना देतो
फांदिचे स्वप्न न तुटणारे
तुझे थवे सराईत उडती
हर ऋतु लुटणारे
तरीही मी नित्य आकाशी
ऋतु फुलवत असतो
असते ठावूक मजला
थवा झुलवत असतो
थवे निघून गेले म्हणून
आभाळ पडत नाही ओस
लुटले जातात बहर तरीही
ऋतुस फुलण्याचा सोस...
(प्रताप)
03/07/2020
"रचनापर्व"
BLOG#prataprachana.blogspot.com
कवडसे हो प्रकाशी
पंखानी चुंबुन घेती
पाखरे आकाशी
दुव्याचा रंग ओंजळीत
मी झेलून अलगद धरतो
रंगाचा आत्मा निरंग
नयनात संयत भरतो
झोळीच्या व्याकुळ तळास
आकाश दान निळे देते
गवतावर झरल्या थेंबाचे
खोल तळे होते
ढगांच्या आत्म्यात मी
शोधत राहतो ओल
संपृक्त झाल्या मातीला
पाण्याचे कसले मोल?
पाखरे कोणाचा निरोप
घेवून आकाशी फिरती?
पाताळाच्या खोल आतुन
आस उमडते वरती
आभाळाचा सांधा
कवडशाशी बिलगतो
स्वप्नांचा थवाही मग
अवकाशातुन विलगतो
मी वाट चुकल्या थव्यांना देतो
फांदिचे स्वप्न न तुटणारे
तुझे थवे सराईत उडती
हर ऋतु लुटणारे
तरीही मी नित्य आकाशी
ऋतु फुलवत असतो
असते ठावूक मजला
थवा झुलवत असतो
थवे निघून गेले म्हणून
आभाळ पडत नाही ओस
लुटले जातात बहर तरीही
ऋतुस फुलण्याचा सोस...
(प्रताप)
03/07/2020
"रचनापर्व"
BLOG#prataprachana.blogspot.com

No comments:
Post a Comment