प्रकाशकुळी सांज
अंधार वांझोटा ठरे
ढगाच्या काळजाला
चांदण्याचे गरे
मी चांद पेरून देतो
आभाळाच्या मातीवर
रंग येतो बहरून
गवताच्या पातीवर
निघुन गेल्या भुरभुरीचे
मी हिशोब मागत नाही
हा श्रावण संधीसाधू
धड ओला वागत नाही
सांज तुषारी बुडते
चांद ओला होतो
झोंबणा-या झुळुकीचा
ऊंच झुला होतो
प्राजक्ताच्या फांदीला
कुठून येतो गंध
ढगात बुडला कवडसा
सांजेत होतो धुंद
राळ उडवता अंधार
सांज हळु बोलते
प्रकाशाचे कवडसे
चांदण्याशी तोलते
चांद उत्सुक असतो
तुझे छतही अधिर होते
अंधाराचे मन मग
उगाच बधीर होते
मी चांद टांगतो नभी
तुझ्या छतावर चांदण सडे
रातराणीच्या फांदिला
फुलांचे सुगंधी चुडे
चांद गंधित होतो
रात पत्थर होते
तुझ्या एक झलकीने
रातराणी अत्तर होते...
♡pr@t@p♡
"रचनापर्व"
25/7/2020
BLOG#prataprachana.blogspot.com

No comments:
Post a Comment