Thursday, July 9, 2020

चंद्रउधाण....


चंद्रउधाणी लाटा
पुनवेची रात
रातराणीच्या कळ्यांनी
टाकली कात

सुगंध वाहता सागर
चांदव्यास भरती
फुलांचे स्पर्श
आभासात झरती

पायात घसरती रेती
ओल ऊमटती ठसे
तुझ्या चांदण आभाळाला
रातीचे लागे पिसे

पाण्यात चांद बुडलेला
सागर धम्मक पिवळा
मनात चाले माझ्या
भरतीचा सोहळा

मी हवा स्पर्शत राहतो
चांदणरंगी अवकाश
कुणाचा व्यापे पायरव
मनास माझ्या सावकाश

जहाजाची डोलकाठी
त्यावर रातपक्षी
पंखावर त्याच्या चमके
चांदण्याची नक्षी

मी दुरदिशेला पाहतो
तुझ्या दिपस्तंभाचे दिवे
मनात उडती माझ्या
हुरहुरीचे थवे

निपचीत निजला किनारा
सागरास उधाण
मी चंद्राच्या भाळावर रेखी
तुझ्या अस्तित्वाचे विधान....!

तु चंद्र बनून हाकारते
सागराची काया
त्याच्या तळात उमटे
तुझी चांदणछाया...
♡pr@t@p♡
"रचनापर्व"
9/7/2020
BLOG#prataprachana.blogspot.com




No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...