Tuesday, July 7, 2020

प्रतिक्षेची फुले.....



ते पाऊस वाहून गेले
ज्यात भिजलो होतो
कडाडत्या विजेखाली
क्षणभर थिजलो होतो

पुर्वी सरी बरसायच्या
आता त्या कोसळतात
अधुन मधून बेमोसमी
नयनात त्या उसळतात

आता नसतो भिजपाऊस
सरी धो धो पडत जाती
कसला हा आघात?
वाहून जाते माती...

मी थेंब झेलत निघतो
दिशा फुटत नाही
फितुर झाल्या पावसाचा
मोह सुटत नाही

मी शोधत राहतो ईकडे
तुला स्पर्शिल्या थेंबाची सर
चिखल झाल्या वाटा
त्यात अंधाराची भर

मी भिजत राही एकला
पाऊस पडत राही
मी जाणून घेतो मनात
ओल्या सृजनाची ग्वाही

घर ओले,खिडकी ओली
मनास ही ओल फुटते
पहिल्या पावलानेच मग
ढग घरात दाटते

आत पाऊस, बाहेर पाऊस
सारेच होते ओले
पावसाला फुटती मग
तुझ्या प्रतिक्षेचे फुले.....
♡pr@t@p♡
"रचनापर्व"
7/7/2020
BLOG#prataprachana.blogspot.com









No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...