Tuesday, July 21, 2020

जाता पाऊल ठसा....



निरोप दिलेच नव्हते
तरीही चंद्र निघून गेला
खिडकीच्या गवाक्षातुन
तो उजेड बघून गेला

वात जळते राऊळी
रातीची निरव शांती
चांदणे लेवून आले
मोत्यांची सफेत कांती

मी गाभारा शोधत जाई
कोणी त्यात न मिळे
गोकुळाच्या पायवाटेवर
उमटले राधेचे पाऊल निळे

गवताच्या स्वप्नांनी
मातीला आला शहारा
गावाच्या वेशीवर कसला
हा रातराणीचा पहारा

राधा निघून जाता
पैंजणनाद राहीले
निश्वासाचे सुर काहूरी
बासरीतुन वाहिले

रात चढत जाता
हे कसले शुभ्र सडे?
पहाटेच्या अवकाशाला
पैंजणी मोतीखडे

सारे शांत असता
रातीस तगमगी सुर
भरतीच्या लाटाचा
चांदण्याला महापुर

आभाळ सांडत असते
मी स्वप्न भरत असतो
जाता पाऊल ठसा
वाटेस झुरत असतो....
♡pr@t@p♡
"रचनापर्व"
21/7/2020
BLOG#prataprachana.blogspot.com











No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...