सांजेच्या स्पर्शाने
आभाळ क्लांत होते
कवडशाचे अंतरंग
ढगात शांत होते
रस्त्याच्या नजरेला
निरोप कसला भेटतो
पायदळीच्या मातीला
कंप कसला सुटतो
पैंजण कसले व्याकुळ
कसली धुन वाजते
सांजेच्या रूपास पाहून
उन हळुवार लाजते
बाभळीच्या फुलावर
धम्मकपिवळी आभा
प्रतिक्षेला हरदिनी
सांज देते मुभा
ढगाच्या अंतःकरणाला
पाखरपंख स्पर्शते
घरट्याचे अंतरंग
का उगा हर्षते?
या सांजेच्या चेटूकाला
रात साथ देते
चांदण्याची कांती
जळती वात होते
वाटेला बहर येतो
धुळीत हुरहुर दाटे
फुलांच्या मिठीआड
लाजती बाभळकाटे
मी पाहत असतो नित्य
दिवसाचे रातीस भेटणे
त्या मिलनघडीच्या
पडद्याआड सांजेचे नटणे
वाहत असतो दुर
एक हुरहुरीचा झरा
काळ्याभिन्न ढगाआडून
चांद ऊगवतो भुरा
वाट स्थिर असते
सांज थांबत नाही
दिस रातीच्या मिलनाचे
पर्व लांबत नाही......
♡pr@t@p♡
"रचनापर्व"
26/7/2020
BLOG#prataprachana.blogspot.com

प्रताप फार छान लिहितो आहे
ReplyDelete