Tuesday, March 29, 2022

डोळ्यात सजलेल्या...

मज तुझी आठवण येते
या भरल्या संध्याकाळी
घरट्यास बिलगती पक्षी
देवून अवकाशाला टाळी

मज तुझे गीत आठवते
श्वासाच्या अंतरावरूनी
जणू हाक मला बिलगते
आभाळात उंच फिरूनी

मज तुझे स्पर्श खुणवती
मोरपिसांच्या रेषे मधूनी
तुच अवतरे मुलायम
माझे अंतरंग भेदूनी

मज आठवती तुझे डोळे
जणू गहिरा काजळ डोह
मी रोखुन धरतो तळव्याने
तुझा आभासी मोह

मज तुझा पुकारा येतो
माझे अनंत भारणारा
मी वारा होवून जावे
गंध तुझा पेरणारा

मज आभास तुझे बिलोरी
भेटावयास आले
सांजेच्या काळजाचे मग
पाणवठे गहिरे झाले

मज वाटे तुझ्या दिशेला
पेरावा एक तारा
अवकाशी फिरणा-या पाखरा
जणू मिळावा चारा

मज भासे तुझे रितेपण
मज वाटे तु यावे
मुक माझ्या शब्दांचे मग
दिर्घ महाकाव्य व्हावे

मज वाटे तु गाव्यात
या ॠचा भिजलेल्या
मी पहाव्या माझ्या कविता
तुझ्या डोळ्यात सजलेल्या.....

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२९ मार्च २०२२










Monday, March 28, 2022

....भारले !!

मखमली स्पर्श तुझे
अंतरंगी मनात फिरले
झाल्या विलग सावल्या
मनात आभास उरले

ही नयनसाजीरी घटीका
डोळ्यांनी टिपले डोळे
जणू रेखीव चेह-यावरले
तीट काजळी काळे

हा गंध तुझा गुलाबी
सांजेला देतो रंग
की भास तुझा मखमली
मोरपिस ही दंग!

बोटांनी बोटावरली
टिपून घेतली नक्षी
जणू बहराच्या फांदीवरती
उतरे रंगीत पक्षी

तु असता अवकाशी
सारे असते भारले
डोळ्यांच्या पापण्याने
क्षण गुजरते सारले

हव्यास भेटीचा दाटे
सांज चढत असता
मी चंद्र पाहतो नभी
गालाच्या मनात हसता

तु गेल्या वाटेवरती
बहर बघ कोसळे
दोन मनाचा अवकाश
एक दिगंती मिसळे

घाटावरती वाहते
तुझ्या मनातील पाणी
एकांताला माझ्या
फुटते तुझीच वाणी

हे काय शिल्लक आत?
हे कोण रंग पेरले?
मी दिल्या मनाला तु
अलगद..अलवार..भारले!

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२८ मार्च २०२२









Sunday, March 27, 2022

शब्दांची भुल....

हे भावविभोर होणे
कुठून येते मनी?
जणू पेटवल्या मझारी
दुव्यात बुडल्या धुनी

गीत उशाशी बसता
वाळवंटी रेत उडते
हरवल्या काफिल्याला
मृगजळी श्रध्दा जडते

मी अंधारव्रताचे चांदणे
मुठीत घेतो भारून
हे कोण आतुन येते?
शब्द सुनेपण सारून

रेतीवर उमटे नक्षी
आभास तुझा हळवा
निघून गेल्या काफिल्याला
ध्रुवाचा तारा कळवा

कोण अवलिया लिहतो
मरूद्यानाचे हिरवे गाणे?
रेतीला खुपते अंतरी
काफिल्याचे निघून जाणे

हवा आणते दुरून
लोकगीताची हाक
गीतातल्या शब्दांना त्या
अवलियाची येते झाक

गीत झरते,रेत उरते
तांडे धरती दिशा
वा-याचा स्पर्शाने होती
झुळुकी वेड्यापिशा

कण नभाला भिडता
चंद्र पसरतो झोळी
मी शोधतो हिरवे बन
वाळवंटी उमटती ओळी

काफिले गात निघती
माझ्या शब्दात दडले गाणे
तुझ्या मरूद्यानाच्या तरूला
मग लगडून येती पाने

काफिले गाती गोडवे
तुझ्या बनाचे फुल
अखंड रेतीवर पसरते
शब्दांची माझ्या भुल....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२७ मार्च २०२२














#ललित # माझ्या कवितेस....

#ललित #
माझ्या कवितेस.....!!

एका अगम्य सायंकाळी अवचित एखादा तारा उगवून त्यानं अवकाश भारावा असं काहीस तुझं अस्तित्व...या निर्मितीच्या अवघड क्षणांना तु ओंजळभर दिल्या फुलांची आरास..मी शब्दातुन तुला वेचत किती मैल पुढे आलो आहे..येताना तुझ्या शब्दकळांचे काजवे मला मार्गाक्रमण करताना रूपकाची साथ देत अवकाशासमीप आणून सोडतात..मी तुडवल्या रस्त्यावर तुझ्या ओंजळ फुलांचे गंध दरवळत असताना माझ्या प्रतिमाही तुझ्या काळीजवेळांशी सांधून घेतात स्वतःला...ही मनातील भावनेची घालमेलही तुझ्या सुबक डोळ्यांनी टिपली जाते..घनव्याकुळी भाव जेंव्हा मनात घोंगावत असतो तेंव्हा त्यास तु एक रंगीत अवकाश देतेस..तुझ्या दिल्या रंगाच्या छटा कधी पेरल्या होत्या एकांताच्या माळरानावर..आता त्या रंगबिजाला अंकूर फुटले आहेत..या रंगीत भावगर्भी छटा घेवून मग पुन्हा मी तुझ्या समीप घुटमळतो..तु देतेस असे काही जे मिळते आहे असा भास होतो पण ते मिळण्याचे अपुर्णत्वही तितकेच व्यापक असते.. जेवढा व्यापक तु अवकाश देतेस...
तुझा भावविभोर चेहरा मला या शब्दबनात अलवार आणून सोडतो...मी तुझ्या गंधाचे नाजूक माग काढत या शब्दबनात हरवत जातो..आणी मग तुच हाक बनून देतेस या शब्दांना भान...मी तुझे शब्दबन घेवून पुन्हा तुझा शोध घेत निघतो...कधी अवकाशी..कधी वाळवंटी..कधी चंद्र..कधी चांदणे..कधी एकले झाड..कधी नदी..कधी समुद्र..कधी वसंत..कधी दिव्याची वात..सारे सारे संदर्भास घेवून मी तुलाच शोधत निघतो...कधी आनंद,कधी दुःख, कधी वेदना,कधी विरह...कधी भास,कधी हर्ष सारे सारे भाव मी अनूभवत फिरतो...तुझे ध्यासपर्व आकाशी भिडते.. मी थकतो..क्लांत होतो ..हुरहुरीच्या एका आभास क्षणी मी अपुर्णत्व अनूभवत ... एक निरव अशांती अनूभवत... एकांताच्या गर्त तळाला जातो आणी आत्मशोधाच्या पहिल्याच क्षणाच्या शुभघडीवर आतुनही तुच प्रतिध्वनीत होतेस!! इतरत्र..सर्वत्र..आत खोलवर तुझाच अदमास असता...कुठेतरी दुर तुझ्याच पावलांचे आभास मग खुणावत असतात...त्या खुणांची गुजभाषा उकलत माझ्या शब्दांचे पाय थबकतात..त्या थबकक्षणात मग तु चक्क बाजूस येवून निर्मीतीमार्गावर माझी सहचारी बनतेस....कोणास तु भावते..कोणास तु भावत नाहीस..पण तु माझ्या निर्मीतीची अभिप्रेरणा..व निर्मितीचा साकार आहेस...तु माझ्या भावविभोरतेचा आकार आहेस.....मी माझी कविता कोणासाठी लिहतो??? ती नसतेच मुळात इतर कोणासाठी !! ती स्वअवतरीत तु असतेस...जो तो आपापल्या परीने त्यात आपला परिघ निवडतो आणी स्वतःप्रत अर्पूण घेतो..त्यात माझे शब्द सामील होतीलच असे नाही...!
माझा भावपट उलगडत मी काय उलगडतो ते तुलाच माहित! कधी मी अपुर्णत्व अनूभवत पुर्णत्वात तुला पाहतो...तर माझ्या पुर्णत्वाला अपुर्णत्व असल्याचा भाव घेवून तु येतेस..कधी हसत..कधी खळखळत..कधी गंभीर..कधी उल्हासित...तु माझ्या पुर्णत्व व अपुर्णत्व याचा भावसेतू आहेस!!
मी तुझातुनच काही वेचतो..तुझ्यातच गुंफतो..आणी वाहतोही तुलाच!! तु स्विकारलेस तर आनंद!! अस्विकारलेस तर??? तरीही हे अर्पण सातत्य सुरू राहील...मायमराठीच्या या अमृतीशब्दकळांचा अमिट झरा जो पावेतो वाहत राहील तो पावेतो हे शब्दांचे तुषार तुझी आकृती बनवत राहतील..तु साकार होवो वा निराकार!!!
कविता निर्मितीच्या लाभलेल्या या अहोभाग्यास कवितेचेच अर्पण!!
' तु शब्द दिले
तु जपले माझे भाव
तु अंतरी असूनही
तुझ्या दिशेला धाव'
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२७ मार्च २०२२


Saturday, March 26, 2022

जिव तयांचा जळतो....

दुर... सुर्य बुडतो
सांज मंद शिलगे
तमास माझ्या गर्द
तुझे चांदणे बिलगे

हो जडशिळेचे दिव्य!
वनास मुक्ती मिळते
की दुःख दगडशिळेचे
पावलास आपसुक कळते

वारा स्तब्ध असता
पक्षाची लयीत गीरकी
व्यथेत गळली पंखजोडी
झुळकीला हो पारखी

हे एकाकी उधाण
सांजेचा तळ गाठते
चंद्र बनाच्या अंतरी
कोण व्याकुळ दाटते

या अनंत अवकाशाला
भास रित्याचे होती
दुर पाखरे दिगंती
सुर कसले देती?

अस्तर चांदण्याचे
हळू हळू मग ढळते
नदी झुळझुळणारी
गावावरून वळते

माग नदीचा घेता
चंद्र दाखवी वळणे
मग अगाध संगमावरती
दोन नद्यांचे मिळणे

शिणता तमाचे डोळे
सुटतो नदीचा माग
नदी वाहवत नेते
चंद्र उजेडी भाग

हा चंद्र नदीत वाहीला
सागरा असाच मिळतो
पुनवेच्या भरती वेळी
जिव तयांचा जळतो.....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
(२६ मार्च २०२२)




सागराच्या भरती खाली...

तु हसता चांदणे
हरखुन जाते सारे
पदराखाली तुझ्या
सारे बनती तारे

ता-याखाली कसले
नक्षत्र उमटून आले
रेतीत उमटल्या लाटा
चिन्ह पावली ओले

रेत झराली झरझर
पावले राहीली मागे
निद्रीस्त सागरतळाला
पुनव चांदणे जागे

हे सागरपक्षी गाती
डोलकाठी दर्यागीत
टिपून सागर घेतो
लाटांची हळवी रित

येती लाटा,जाती लाटा
उभा किनारा असता
लाटांच्या निरोपघाईच्या
सोसत ओहोटी खस्ता

लाटा सागर वाहती
सागर लाटा झेली
पावलाच्या ठशात शिल्लक
हाक एकली ओली...

हाक पोहचे नभी
चंद्र गाठतो खोली
तुझे चांदणे हसते
सागराच्या भरतीखाली...
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
(२६ मार्च २०२२)







सांजभुलीचा यात्री -कवी ग्रेस...

सांजभुलीचा यात्री - कवी ग्रेस...

अगाध,अपार असा एक आयुष्याचा कोपरा असतो आणि त्या कोप-यात नेमके काय? याचा आपण शोध घेत असता अचानक एखादी अपुर्व खुण सापडते आणी तो कोपरा मग आवडीचा कोपरा होतो..तसा माझा आवडता कोपरा म्हणजे कवी ग्रेस...!!
स्वतःची आत्मधून ज्या सुरातुन ओळखता येते ती शब्दकळा घेवून कवी ग्रेस येतात मात्र ती शब्द कळा हवा तो अर्थ आपणास देईलच असा विश्वास ठेवणे या बाबत कवी ग्रेस हमी देत नाहीत पण स्वतःतील आत्मधूनीची सुरावट ते हमखास आपल्याला देतात! म्हणून कवी ग्रेस समजतात पण उमजत नाहीत. मात्र त्यांच्या शब्दांचे वैभव एवढे अपार आहे की निव्वळ कविता वाचायला घेतली तर ती मनात निनाद करते..आणी एक भावविभोर नाद गुंजारव करतो
'मी खरेच दुर निघालो
येवू नको ना मागे
पाऊस कुठेतरी वाजे
हृदयाची तुटती धागे...'(ग्रेस)
ग्रेस निनादकवी आहेत. संस्कृतप्रचूर भाषेतून मराठी कविता मुक्त झाल्यानंतर ती मराठीप्रचूर होते ती ग्रेसांच्या कालखंडातच .मी मी म्हणनारे भाषाप्रभू त्यांच्या रूपक,प्रतिमा आणी प्रतिभेशी जुळवून घेता घेता थकतात आणी मग ते सोडून त्यांच्या कवितेतील नाद,भाव याचा आपापल्या अवकाशापुरता आस्वाद घेतात. ग्रेस समजायला ग्रेसीय अभिनिवेषच महत्वाचा आहे. त्या शिवाय मग एकच पर्याय...'ग्रेस दुर्बोध आहेत' असे म्हणने....
कवी ग्रेस हे मराठी कवितेतील एकमेव कवी आहेत ज्यांची कविता ही त्यांच्या उंचिला गेल्याशिवाय कळत नाही. आणी ती कळत नाही म्हणून आपण वाचणे ही सोडत नाही!!
'घडवेन असे मी वृत्त
प्राणांच्या अलगद खाली
अन् करीन पाऊस इथला
शब्दांच्या पुर्ण हवाली' ..

ही ग्रेसीय शैली मराठी काव्य विश्वाला प्रचंड समृद्ध करून गेली आहे. प्रचंड ताकदीचे शब्दसंयोजन,अत्यंत भावगर्भी रूपके, असामान्य प्रतिके, आणी अत्यंत सूक्ष्म भाव टिपणारा व्यापक अवकाश,त्यात एक आत्ममधूर नाद,ग्रेसीय स्पर्श.. सारे अनोखे,अद्वितीय, अप्रतिम,देखणे,अजोड!! ग्रेसांनी मराठी कवितेला,भाषेला एक उंची दिली आहे. अशा अगम्यसुलभ कवी ग्रेसांचे जाणे नैसर्गिकच!! पण तरीही खुपणारे...!
त्यांची कविता एक अप्रतिम देखणे लावण्य घेवून मराठी काव्यविश्वात चिरतरूण बनली आहे. 
"दिसे क्षितीज असे की
भास ओळखीचा वाटे
ढग पांगताना मग
हळू चांदणीही मिटे!

२६ मार्च त्यांचा स्मृतीदिन!
अशा भावगर्भी कवीला शब्दगर्भी भावांजली!
कवी ग्रेस यांच्या कवीतेला सलाम!
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 




Thursday, March 24, 2022

गीत आर्त पुराणे...

श्वासाचे गाठावे अंतर
नयनाचा साजीरा डोह
मखमली स्पर्श सांजेचा
हा कसला मोहक मोह?

रेखता तळव्यावर गोंदण
चेह-यास ये लकाकी
टिपून घ्यावे चांदणे
द्यावी तुला चकाकी

गंध तुझा भारतो
सांज होता हळवी
मौन अव्यक्त माझे
तुजसाठी शब्द जुळवी

चंद्राचा चेहरा होता
ओंजळीत फुलला माझ्या
गंधीत कळ्या प्राजक्ताच्या
जणू बहरल्या ताज्या

ओठांवर फुलले चांदणे
चंद्र असा का पाही?
हा वारा उधाण होवून
आत खोलवर वाही

स्पर्शदान चंद्र देई
हलक्या मंद सुराने
तु सुचलेले आर्त गीत
भावविभोर पुराणे

निघता दुर दिशेला
मनात काही उरते
चंद्राच्या मंद उजेडी
रात मुक झुरते
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
(२४मार्च २०२२)







Tuesday, March 22, 2022

अपार....

नजरेत दिसावे सारे
असता बंद डोळे
मी सजवत असता मनी
रंगीत तुझे सोहळे

शब्द कोणते आणू?
गुपीत तुला कळणारे
की वाहू तुजला चांदणे?
मंद मंद जळणारे

अपार सारे असावे
फक्त तुला भावणारे
मी अभंग व्हावे व्याकुळ
भगवंता पावणारे

थेंब थेंब शब्द
तुझ्या मनी झरावे
मी अर्पूण दिलेले वसंत
पानगळीतही उरावे

असे असावे सारे
आपसूक तुला कळावे
दिप तुझ्या नयनाचे
बंद नयनात या जळावे....

उजेड यावा अलगद
अंधार हा मिटावा
की पांग या हृदयाचा
जन्मापार फिटावा...
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
(२२ मार्च २०२२)











Sunday, March 20, 2022

मग आत पुन्हा....

#मग आत पुन्हा....!!


मी दुर निघतो
तुझी प्रतिके,प्रतिमा
आणी तुझी सृष्टी सोडून
आणी कविता शोधत बसतो...

मग आत पुन्हा ...

शब्दांचा घुमार
भावनेची उच्चावने
आणी तुझा चेहरा
मंद हसत असतो....
(प्रताप )
२१ मार्च २०२२
जागतीक कविता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
www.prataprachana.blogspot.com








कत्तलीच्या जमान्यात..

या कत्तलीच्या जमान्यात
पेरावी म्हणतो कविता
जी उगवेल बहरून
अन् देईल सुंदर फुले..

दुश्मनाचे हृदयही मग
अलिंगन देईल तुला मला
आणी होतील मग
शुभ्र कबूतरी सुले.....

(प्रताप )
२१ मार्च २०२२
जागतीक कविता दिनाच्या सर्व कवींना हार्दिक शुभेच्छा!
www.prataprachana.blogspot.com







शाकारले शब्द..

रोज बुडतो सुर्य
रातीची शोधण्या खोली
कविताही उमलून येते
घेवून शब्द अबोली

झांजरसंध्या बसते
झाडाखाली दूर
रात काहूरी छेडते
गोकुळछंदी सुर

ही पडली पाने निश्चल
प्राण फुंकतो वारा
झाडाखाली उतरतो
एक आसमानी तारा

ता-याला कळते दुःख 
पाने झडून गेली
चिमणी दुःखभराने
मुक उडून गेली

जाता जाता तीने
एक ठेवले गाणे
त्याच्या सुरात कविता 
व्यापत असते पाने

कविता गीत होते
शब्दाला काळोख डसतो
मी ता-याच्या दिशेस पाहून
चंद्राचे डाग पुसतो

डाग तरीही राहतो
चंद्र तरीही उगवे
शाकारल्या शब्दात माझ्या
दुःखाचे डोंगर नागवे....
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(२० मार्च २०२२)

Saturday, March 19, 2022

प्रकाश झरे...

ही गगनबाधी वेळ 
या चंद्र गारूडी राती
आठवणीचे कळप शामल
मनात परतून येती

झंकार विणेचा विझतो
दिवा गातो गाणे
वैशाखास बिलगे पळस
वा-यावर उडती पाने

ढगात रूतला उष्मा
चंद्र शितल का भासे?
पारध होत्या पक्षाने
चुंबावे पारध फासे

किरणांचे डोंगर रचता
शिखरावर चंद्र जळतो
राधेच्या पैंजणाला जेंव्हा 
सुर बासरी मिळतो

या ओंजळीतून निसटे
तु दिलेले फुलपाणी
निशीगंधाच्या आत्म्याला 
फुटता तुझी गंधवाणी

हे काय तुटते आत?
ध्वनी त्यास नसतो
डाग लागला चंद्र 
मुक तरीही हसतो

का उजडत नाही तत्पर?
डोळ्यांना रात डसते
किती छळावे व्याकुळा!
असे कुठे का असते!!?

निनादाचे निर्वात गर्जे
सुर ही अबोल गाती
तम भारून येतो चंद्र 
पुनवेच्या व्याकुळ राती

खिडकीला लोभ चांदण्याचा
चांदणे अजाण खरे!
चांद तृष्ण मनाने शोधतो
तुझ्यातील प्रकाश झरे....
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१९ मार्च २०२२)

Friday, March 18, 2022

मनात उरावी ओवी....

ती जखम गर्दगहीरी
भिंतीवर लिहल्या गझला
शब्दांचे रंग कोसळले 
दिप देवळीत निजला

हे झाड वडाचे उभे
गाव सारा पाहते
निघून गेल्या पावलाचे
पैंजण मागे राहते

शेतभरारी घेवून
वारा निरोप आणतो
मातीचा मगदूर ओला
जात पिकाची जाणतो

वेशीवर रातसमयी
कोण पेटवले दिवे?
नदी तिरावर उमटती
तरंगाचे खोल थवे

खडा फेकला कोणी?
नदीत दाटली हाक
जणू रणी उसासे कर्ण
उपसत रूतले चाक

काल पुनवेच्या राती
चंद्र होता दाटला
आज भरल्या राती
तो क्षिण असा का वाटला?

कोण फिरवली नजर?
चंद्र असा का झरतो
उजेड त्याचा अनवाणी
नदी तिरावर फिरतो

हाक येता येत नाही 
रात सरत निघते पुढे
भिंतीवर पुन्हा पडतील
शब्दफुलांचे गंधीत सडे....

चंद्र पसरता झोळी 
त्यास कविता द्यावी
अभंग अर्पूण सारा
मनात उरावी ओवी....
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१८ मार्च २०२२)

Thursday, March 17, 2022

गुलाबी आसमंत..

की रंग तुझा गुलाबी 
आसमंती संध्याकाळी 
रात सजवत असते
पुनवेची चंद्रहोळी

रंगाचे तुझ्या गालबोट
मग आठवणीही रंगीत
हवेत पसरते अलवार
व्याकूळ आर्त संगीत

कोणता सजवू रंग?
तुझ्या आभास राती
तु निरोप दिलेली पाखरे
गीत कोणते गाती?

पंखावर त्यांच्या चंद्र 
चांदणे साजरे सजते
तुटलेल्या ता-याआड
स्वप्न रंगीत रूजते

तु तुटला तारा घेवून
उगवतीच्या दिशेस निघते
सप्तर्षी ता-याआडूनी
हे कोण खोलवर बघते?

गर्द साचल्या तमात
मी वेचत असता तारे
निरोप तुझा आभासी
घेवून येती वारे

मी नभाच्या अंतःकरणी 
मग एक तारा ठेवतो
सुर्य उगवतो तोवर तो
अखंड जागा तेवतो

विझता तारा अर्पूण
रात उजळते अवकाश
रंग तुझा गुलाबी 
व्यापतो मग सावकाश...
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१७ मार्च २०२२)

Wednesday, March 16, 2022

चंद्र गुपीत जाणे....

पळसावर चंद्र सांडला
पुनवेचा वणवा पेटे
सांजेच्या एकट वेळी 
तुला पहावे वाटे

वाट कशी निघाली
दुर गावा कडे
जिव दाटून चंद्रवेळी
तुझ्यात गुंतुन पडे

हास्य तुझे चंदेरी
चंद्र जणू की हसतो
डोळ्यांच्या गर्त डोहात
भाव अनामिक दिसतो

हे काय वितळते हाती
चंद्र का तु घेतला?
या पुनवे वरती कोण
रंग तुझा बघ ओतला

तुझ्या गंधा भोवती 
हे सांजेचे मंद वलय
सुर्य लोपला अवनी
रातीत प्रकाश विलय

तु मुक नको ना राहू
चांद बोलत असता
मन उधाण रोखून धरते
तु शब्द तोलत असता

नको असेल वळण तर
रस्ता पुढे सरकतो
हे गीत तुझ्या मौनाचे
जिव मग थिरकतो

भेटू अथवा न भेटू
रस्ता गायील गाणे
कोण दुरावा सोसेल?
हा चंद्र गुपीत जाणे

मी चंद्र दिला हाती
अवकाश तुझा असावा
बंद जाहल्या नयनाआड
त्याचा उजेड दिसावा

तुझ्या चंदेरी चेह-याची
उमगते मला भाषा
तु रेखत असता तळव्यावर 
माझ्या तळव्याची रेषा....
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१६ मार्च २०२२)

Tuesday, March 15, 2022

गोकुळ व्याकुळ जशा...

शुभ्रधवल फुलासम
तुझे उगवून येणे
फुलाच्या स्पर्शाने
मग शहारून येती पाने

प्रतिक्षारत रान उभे
आभास गळतो नभी
आस दाटल्या नयनांना
मिटण्याची कसली खुबी?

हात बोलतो हाताशी
रस्ता असता सूना
मी शोधत असतो तुझ्या 
तळव्यावर माझ्या खुणा

शब्द असता मुके
मन अखंड बोलत असते
हे कोण असे हृदयाला
ओंजळीत झेलत असते

का करावी प्रतिक्षा?
का निघावे दुर...?
मन का आळवते
तुझ्यात भिजले सुर?

यावे की निघावे?
कसला अजाण प्रश्न
की तळे भासते अनादी
शतजन्माचे तृष्ण

पुन्हा पुन्हा वाटे
तुझा बहर धारून घ्यावा
तुझ्यातला अनंत मजकडे
तुला सारून यावा

या केसांच्या लयीने
रात सळसळे मनी
सावरून तुला घ्यावे
भान हरवल्या क्षणी

मनास लागे ओढ
तु गेलेली दिशा
हाका दाटती आसमंती
गोकुळ व्याकुळ जशा...
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१५ मार्च २०२२)

Monday, March 14, 2022

झाड फुलांचे वाहतो...

शब्द कोणते वेचू?
कवितेला येईल रंग
तु निभवावा अनादी
माझ्या शब्दाशी संग....

निज दाटले डोळे
स्वप्न जागे उशाशी 
निशीगंधाच्या खाली
पडती फुलांच्या राशी

एक उचलता फुल
चाहूल तुला मग लागे
हा गंध कुणाचा दरवळे
शब्दांच्या माझ्या मागे?

या गंधभारल्या फुलांची
मी व्याकुळ  कविता लिहतो
एकेका शब्दासाठी तुला
मी झाड फुलांचे वाहतो
       ▪ (Pr@t@p)▪
           "रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
          (१४ मार्च २०२२)

Sunday, March 13, 2022

जागर थवा...

प्रतिक्षा कर...
शब्दांच्या गहिवराचे
की थेंब दाटतील नयनी
पहाटेच्या दहिवराचे

ओझरता स्पर्श तुझा
कसला व्रण देती
अव्यक्त होण्याआधी माझे
शब्दही प्रण घेती

दवात भिजती शब्द
हा ॠतु कोणता असतो
शिशिर जणू चैत्रातुन
अजाण मुक हसतो

गवसणी तुला घालण्या
कवितेची येती पक्षी 
तु निद्रेवर माझ्या रेखते
भिजलेली दवात नक्षी

अंधार विरघळू लागे
तु हसता मंद गाली
चांद ढळतो थोडा
चांदण्याच्या पदराखाली 

तु गीत कोणते दिले
पाखरे फांदीवर गाती
किलबिलीच्या धुसर प्रहरी
पुलकीत होते माती

मी निघता तुझ्या दिशेला
सुर्य उगवतो नवा
परतून येत असतो
तुझ्या स्वप्नांचा जागर थवा

▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१३ मार्च २०२२)

Saturday, March 12, 2022

चांदणे राख...

ही गहन स्मरणे येता
मनात चांदणे सजले
तु हवेत पेरले गंध
ताटवे फुलांचे रूजले

फुलांची झड सांडते
तुझी चाहूल लागता
मी बहर देतो अर्पून
तु मिलनाचे दुवे मागता

तु असता चंद्र उगवे
नसता तमाचे पर्व
चांदण्याचे रान स्मरते
रातीचे भोग सर्व

तु डोळे मिटवून पाहते
स्वप्न कोणते रंगीत?
समईच्या खोल तळातुन
वाजते व्याकुळ संगीत

ही धुन चंद्रओली
ही बावर होती घडी
तरंग अलिंगन देती
शांत नदीच्या थडी

हा सारस काय वेचे
पाण्यातले चांदणे..?
की मनावर उमटलेले
तुझ्या आभासाचे गोंदणे?

हा रात बावरा वारा
कोणाचे डोळे आणतो?
डोळ्यात दाटल्या स्वप्नांचा
मी शब्दातुन शेला विणतो

तु बोल जरा मनाशी
चांदण्यातुन मिळेल उत्तर
वा-याच्या अंतर आत्म्याला
मग बाधेल तुझे अत्तर

या अत्तरगंधी वेळी 
अंतरी उमटते हाक
नयनाच्या पापण्याआड
तु माझे चांदणे राख.....
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१२ मार्च २०२२)

Friday, March 11, 2022

स्पर्शिले वारे...

मी गाऊ कशी गीते?
नयनाच्या पापणी खाली
सय दाटल्या सांजवेळी 
वाट भासते ओली

तु अनाहूत पावलाने
पावसाची सर होई
तुझ्या तनूचा मृदगंध
त्यास दरवळ घाई

गर्द आठवांच्या ढगाने
कविता अनंत रचल्या
चंद्र साचल्या वेळी त्या
अलवार अलगद सुचल्या

एक कविता तुला
अर्पावी सांजवेळी 
गंध तुझ्या शब्दांचा
प्रतिकांची भरते झोळी 

तु मला मनात घ्यावे
तुझ्या मनाला जोग
मी वाहावे नदीतिरावर
तुझ्या आठवांचे विव्हल भोग

तु चांद जणू कुशीचा
सजवत असतो रात
कविता माझी टाकते
पुन्हा नव्याने कात

तु यावे नित्य तेथे
जिथे कविता उगवे
रातीच्या गर्द क्षणावर
रंग चढावे भगवे

तु असते! तु नसते!
काही समजत नाही 
कवितेचे काळीजबन
मग मजला उमजत नाही 

मी रचतो ॠचा अनंत
घेवून तुझे सारे
गंध पेरत घुटमळती
तुला स्पर्शिले वारे...
▪ (Pr@t@p)▪
           "रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
          (११ मार्च २०२२)

Thursday, March 10, 2022

तुझ्या दिशेचा तारा....

एक रम्य सायंकाळी 
रस्ता अनाहूत भेटला
जणू मंदिराच्या गाभारी
नंदादीप पेटला....

लख्ख चांदणे ओंजळी
कोण पेरत चालले?
हे अस्तर चंद्रमाचे
अलवार कोण खोलले?

या संध्याकाळी बिलगे
झाडाला एक वेली
नयनात दाटलेली
सांज एक मग ओली

थबकत्या पाउल वेळी 
रस्त्याला फुटती फाटे
भरल्या सांज वेळी मग
रिते रिते का वाटे ??

ही हळवी हाक कुणाची
मनात गुंजत राहते
बंद डोळ्या आडूनी 
कोण चांदणे पाहते?

रेशीमबंधी स्पर्शाचे
मऊ मखमली आभास
गुंफल्या हाताचा
अबोल दिर्घ प्रवास 

एक रम्य सायंकाळी 
जिव असा लागतो
निद्रेच्या तमाखाली
चंद्र निरव जागतो

या सांज समयी वाहे
आठवणीचा वारा
मी रिक्त मनाने पाही
तुझ्या दिशेचा तारा...

▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१० मार्च २०२२)

Wednesday, March 9, 2022

वसंत व्हावा..!!

तु गेल्या संध्याकाळी 
भासते सारे रिते
तळव्याच्या उंचवट्यावर
तु लिहलेली आर्त गीते

मी शब्द गीतांचे पाही
त्यांना तुझीच नक्षी
बहराच्या छायेखाली
निःशब्द हळवे पक्षी

खंत कसली जाचते?
निःश्वासाची भाषा
पहा तुझ्या हातावर 
तळव्याची माझ्या रेषा

निरोप कसला घ्यावा
ठेवून मागे सारे?
असेल रात तर अवकाशी 
अलवार उगवतील तारे

जरी नसला आभाळी चंद्र 
तरी आभास त्याचा असतो
हर वळणाच्या पल्याड
एक सुंदर रस्ता दिसतो

मी दिगंत शोधत असता
गहीवर तुझा का यावा?
तु दिल्या निरोपी निर्माल्याचा
रंगीत वसंत व्हावा.....!

▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(९ मार्च २०२२)

Tuesday, March 8, 2022

चांदणे सरसरून आले...

हात तुझे साथीला
मौनाची असता भाषा
सांज घडीस बिलगती
तळव्याच्या हळव्या रेषा

कोण कसे भावते
व्हावा कसा खुलासा?
नुसते आभास साथीला
वाटे तरी दिलासा

कोण द्यावे उत्तर
कसला पडतो पेच
ओंजळीतले स्पर्श 
अलवार तु वेच

घनव्याकुळ सुंदर डोळे 
जणू चैत्रबनाची दाटी
ही रात रोखून द्यावी
तुझ्या काजळा साठी

हे कसले अंबर आभास 
असती समीप सारे
मी पाठवली खुशाली
पहा!लुकलुकणारे तारे

यावे कधी त्या दिशेला
वारा मंद वाहतो
तुझ्या फुलाचा बहर
ज्या वेलीवर राहतो

आभास नुसते सारे
या दिशेत भरून गेले
रातीच्या ठायी कसले
चांदणे सरसरून आले?
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(८ मार्च २०२२)

Monday, March 7, 2022

अत्तरओली वेळ...

सांज गहीरी होताना
तम गोठले होते
तुझ्या स्पर्शाचे चांदणे
ते ढग कोठले होते?

रस्ता बुडत होता
मन माघारा धावले
तु गेल्या रस्त्यावर
अजूनही माझी पावले

तुझा आभास चांदणरंगी
पाहती नभातुन पक्षी
तु स्पर्श गोंदणे रेखले
शब्दांना माझ्या नक्षी

तु हसता पक्षी हसले
सावरत रंगीत पिसे
तु चांदणपेरा केला
जणू सागरमोती जसे

दुर चंद्र निजला
रात अशी का जळते?
वातीची उजेड भाषा
वा-यास नव्याने कळते

हवेला गंध कसला
ही आर्तता कसली दाटे?
निशीगंधाचा सांगावा येई
तुझ्या तनाच्या वाटे

न बोलता एकही शब्द
सारे उमजत गेले
तु दिल्या कळ्यांचे सारे
मनात अत्तर झाले

ही अत्तरओली वेळ 
तुझा निरव दुरावा
मी प्रतिक्षारत राती
नभी ठेवला चंद्र पुरावा

चंद्र जळताना नभी
वातीत चांदणे दाटते
या खुल्या आभाळाखाली
आसपास असावे वाटते...
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(७ मार्च २०२२)

Sunday, March 6, 2022

पंखांच्या पुर्ण हवाली....

पक्षी दुर निघाले
झाड राहीले मागे
विण उसवते पोरकी
अनंत तुटती धागे

या सरत्या हंगामाला
कधी लगडतील पाने?
पक्षी परतून फांदी
देतील रंगीत गाणे?

झाडाला शिशिर बाधे
पक्षांना कसली बाधा?
पंख वाहती कृष्ण 
झाड जाहले राधा

ही शिळ कोण विसरले
झाडाच्या मुळापाशी?
झाडातुन दाटून येती
हिरव्या चैत्र राशी

होईल सारे हिरवे
झाडाला लागेल गीत
पक्षी परतून येतील
सोडून आपली रीत

येईल मग सांगावा
पावलांच्या तळव्या खाली
मग होईल वसंत माझा
पंखाच्या पुर्ण हवाली.....
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(६ मार्च २०२२)

Saturday, March 5, 2022

वृक्ष जणू उन्मळे...

फुलवत असता सांजेला
आठवणीचे मळे
अजाण दाटून येते 
वृक्ष जणू उन्मळे

या शिळेत अहिल्या राहते
भाव स्पर्शासाठी आसूस
शब्दांनी पुसून घ्यावेत
दगडातुन पाझरते टिपूस

हे जडबंधी पावले 
उचलून कुठे निघावे?
की आत दडल्या तुझे
घ्यावेत मुक सुगावे?

हे आक्रंदाचे अरण्य
हा कसला वणवा पेटे?
दुर असा हा चंद्र 
इकडे भरती मनात दाटे

काळोखाच्या आडोशाने
हे आठवणीचे वारे
मी तुडवत माळरान निघतो
सांडलेले जमीनभर तारे

आतली विण उसवते
मी मला नव्याने पाहतो
मनात दाटल्या अजाणाला
मग एक कविता वाहतो

कसे घ्यावेत अदमास?
वाराही गुणगुणत नाही 
लिहून सारे सारे...
तरी उरते मनात काही 

हे अपूर्णतेचे अरण्यरूदन
काळोख अंधारी जळतो
लिहून झाल्या कवितेला
हा कुठला ध्यास छळतो?

कधी दिर्घ निःश्वासाचीही
कविता बिलोरी होते
जात्याच्या ओवीमधूनी जणू
माहेरवाशिण गीत गाते.......
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(५ मार्च २०२२)

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...