Tuesday, March 8, 2022

चांदणे सरसरून आले...

हात तुझे साथीला
मौनाची असता भाषा
सांज घडीस बिलगती
तळव्याच्या हळव्या रेषा

कोण कसे भावते
व्हावा कसा खुलासा?
नुसते आभास साथीला
वाटे तरी दिलासा

कोण द्यावे उत्तर
कसला पडतो पेच
ओंजळीतले स्पर्श 
अलवार तु वेच

घनव्याकुळ सुंदर डोळे 
जणू चैत्रबनाची दाटी
ही रात रोखून द्यावी
तुझ्या काजळा साठी

हे कसले अंबर आभास 
असती समीप सारे
मी पाठवली खुशाली
पहा!लुकलुकणारे तारे

यावे कधी त्या दिशेला
वारा मंद वाहतो
तुझ्या फुलाचा बहर
ज्या वेलीवर राहतो

आभास नुसते सारे
या दिशेत भरून गेले
रातीच्या ठायी कसले
चांदणे सरसरून आले?
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(८ मार्च २०२२)

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...