ही गगनबाधी वेळ
या चंद्र गारूडी राती
आठवणीचे कळप शामल
मनात परतून येती
झंकार विणेचा विझतो
दिवा गातो गाणे
वैशाखास बिलगे पळस
वा-यावर उडती पाने
ढगात रूतला उष्मा
चंद्र शितल का भासे?
पारध होत्या पक्षाने
चुंबावे पारध फासे
किरणांचे डोंगर रचता
शिखरावर चंद्र जळतो
राधेच्या पैंजणाला जेंव्हा
सुर बासरी मिळतो
या ओंजळीतून निसटे
तु दिलेले फुलपाणी
निशीगंधाच्या आत्म्याला
फुटता तुझी गंधवाणी
हे काय तुटते आत?
ध्वनी त्यास नसतो
डाग लागला चंद्र
मुक तरीही हसतो
का उजडत नाही तत्पर?
डोळ्यांना रात डसते
किती छळावे व्याकुळा!
असे कुठे का असते!!?
निनादाचे निर्वात गर्जे
सुर ही अबोल गाती
तम भारून येतो चंद्र
पुनवेच्या व्याकुळ राती
खिडकीला लोभ चांदण्याचा
चांदणे अजाण खरे!
चांद तृष्ण मनाने शोधतो
तुझ्यातील प्रकाश झरे....
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
(१९ मार्च २०२२)
No comments:
Post a Comment