पळसावर चंद्र सांडला
पुनवेचा वणवा पेटे
सांजेच्या एकट वेळी
तुला पहावे वाटे
वाट कशी निघाली
दुर गावा कडे
जिव दाटून चंद्रवेळी
तुझ्यात गुंतुन पडे
हास्य तुझे चंदेरी
चंद्र जणू की हसतो
डोळ्यांच्या गर्त डोहात
भाव अनामिक दिसतो
हे काय वितळते हाती
चंद्र का तु घेतला?
या पुनवे वरती कोण
रंग तुझा बघ ओतला
तुझ्या गंधा भोवती
हे सांजेचे मंद वलय
सुर्य लोपला अवनी
रातीत प्रकाश विलय
तु मुक नको ना राहू
चांद बोलत असता
मन उधाण रोखून धरते
तु शब्द तोलत असता
नको असेल वळण तर
रस्ता पुढे सरकतो
हे गीत तुझ्या मौनाचे
जिव मग थिरकतो
भेटू अथवा न भेटू
रस्ता गायील गाणे
कोण दुरावा सोसेल?
हा चंद्र गुपीत जाणे
मी चंद्र दिला हाती
अवकाश तुझा असावा
बंद जाहल्या नयनाआड
त्याचा उजेड दिसावा
तुझ्या चंदेरी चेह-याची
उमगते मला भाषा
तु रेखत असता तळव्यावर
माझ्या तळव्याची रेषा....
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
(१६ मार्च २०२२)
No comments:
Post a Comment