मी गाऊ कशी गीते?
नयनाच्या पापणी खाली
सय दाटल्या सांजवेळी
वाट भासते ओली
तु अनाहूत पावलाने
पावसाची सर होई
तुझ्या तनूचा मृदगंध
त्यास दरवळ घाई
गर्द आठवांच्या ढगाने
कविता अनंत रचल्या
चंद्र साचल्या वेळी त्या
अलवार अलगद सुचल्या
एक कविता तुला
अर्पावी सांजवेळी
गंध तुझ्या शब्दांचा
प्रतिकांची भरते झोळी
तु मला मनात घ्यावे
तुझ्या मनाला जोग
मी वाहावे नदीतिरावर
तुझ्या आठवांचे विव्हल भोग
तु चांद जणू कुशीचा
सजवत असतो रात
कविता माझी टाकते
पुन्हा नव्याने कात
तु यावे नित्य तेथे
जिथे कविता उगवे
रातीच्या गर्द क्षणावर
रंग चढावे भगवे
तु असते! तु नसते!
काही समजत नाही
कवितेचे काळीजबन
मग मजला उमजत नाही
मी रचतो ॠचा अनंत
घेवून तुझे सारे
गंध पेरत घुटमळती
तुला स्पर्शिले वारे...
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
(११ मार्च २०२२)
No comments:
Post a Comment