Saturday, March 26, 2022

सागराच्या भरती खाली...

तु हसता चांदणे
हरखुन जाते सारे
पदराखाली तुझ्या
सारे बनती तारे

ता-याखाली कसले
नक्षत्र उमटून आले
रेतीत उमटल्या लाटा
चिन्ह पावली ओले

रेत झराली झरझर
पावले राहीली मागे
निद्रीस्त सागरतळाला
पुनव चांदणे जागे

हे सागरपक्षी गाती
डोलकाठी दर्यागीत
टिपून सागर घेतो
लाटांची हळवी रित

येती लाटा,जाती लाटा
उभा किनारा असता
लाटांच्या निरोपघाईच्या
सोसत ओहोटी खस्ता

लाटा सागर वाहती
सागर लाटा झेली
पावलाच्या ठशात शिल्लक
हाक एकली ओली...

हाक पोहचे नभी
चंद्र गाठतो खोली
तुझे चांदणे हसते
सागराच्या भरतीखाली...
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
(२६ मार्च २०२२)







No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...