Thursday, March 24, 2022

गीत आर्त पुराणे...

श्वासाचे गाठावे अंतर
नयनाचा साजीरा डोह
मखमली स्पर्श सांजेचा
हा कसला मोहक मोह?

रेखता तळव्यावर गोंदण
चेह-यास ये लकाकी
टिपून घ्यावे चांदणे
द्यावी तुला चकाकी

गंध तुझा भारतो
सांज होता हळवी
मौन अव्यक्त माझे
तुजसाठी शब्द जुळवी

चंद्राचा चेहरा होता
ओंजळीत फुलला माझ्या
गंधीत कळ्या प्राजक्ताच्या
जणू बहरल्या ताज्या

ओठांवर फुलले चांदणे
चंद्र असा का पाही?
हा वारा उधाण होवून
आत खोलवर वाही

स्पर्शदान चंद्र देई
हलक्या मंद सुराने
तु सुचलेले आर्त गीत
भावविभोर पुराणे

निघता दुर दिशेला
मनात काही उरते
चंद्राच्या मंद उजेडी
रात मुक झुरते
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
(२४मार्च २०२२)







No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...