Tuesday, March 22, 2022

अपार....

नजरेत दिसावे सारे
असता बंद डोळे
मी सजवत असता मनी
रंगीत तुझे सोहळे

शब्द कोणते आणू?
गुपीत तुला कळणारे
की वाहू तुजला चांदणे?
मंद मंद जळणारे

अपार सारे असावे
फक्त तुला भावणारे
मी अभंग व्हावे व्याकुळ
भगवंता पावणारे

थेंब थेंब शब्द
तुझ्या मनी झरावे
मी अर्पूण दिलेले वसंत
पानगळीतही उरावे

असे असावे सारे
आपसूक तुला कळावे
दिप तुझ्या नयनाचे
बंद नयनात या जळावे....

उजेड यावा अलगद
अंधार हा मिटावा
की पांग या हृदयाचा
जन्मापार फिटावा...
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
(२२ मार्च २०२२)











No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...