पक्षी दुर निघाले
झाड राहीले मागे
विण उसवते पोरकी
अनंत तुटती धागे
या सरत्या हंगामाला
कधी लगडतील पाने?
पक्षी परतून फांदी
देतील रंगीत गाणे?
झाडाला शिशिर बाधे
पक्षांना कसली बाधा?
पंख वाहती कृष्ण
झाड जाहले राधा
ही शिळ कोण विसरले
झाडाच्या मुळापाशी?
झाडातुन दाटून येती
हिरव्या चैत्र राशी
होईल सारे हिरवे
झाडाला लागेल गीत
पक्षी परतून येतील
सोडून आपली रीत
येईल मग सांगावा
पावलांच्या तळव्या खाली
मग होईल वसंत माझा
पंखाच्या पुर्ण हवाली.....
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
(६ मार्च २०२२)
No comments:
Post a Comment