सांजभुलीचा यात्री - कवी ग्रेस...
अगाध,अपार असा एक आयुष्याचा कोपरा असतो आणि त्या कोप-यात नेमके काय? याचा आपण शोध घेत असता अचानक एखादी अपुर्व खुण सापडते आणी तो कोपरा मग आवडीचा कोपरा होतो..तसा माझा आवडता कोपरा म्हणजे कवी ग्रेस...!!
स्वतःची आत्मधून ज्या सुरातुन ओळखता येते ती शब्दकळा घेवून कवी ग्रेस येतात मात्र ती शब्द कळा हवा तो अर्थ आपणास देईलच असा विश्वास ठेवणे या बाबत कवी ग्रेस हमी देत नाहीत पण स्वतःतील आत्मधूनीची सुरावट ते हमखास आपल्याला देतात! म्हणून कवी ग्रेस समजतात पण उमजत नाहीत. मात्र त्यांच्या शब्दांचे वैभव एवढे अपार आहे की निव्वळ कविता वाचायला घेतली तर ती मनात निनाद करते..आणी एक भावविभोर नाद गुंजारव करतो
'मी खरेच दुर निघालो
येवू नको ना मागे
पाऊस कुठेतरी वाजे
हृदयाची तुटती धागे...'(ग्रेस)
ग्रेस निनादकवी आहेत. संस्कृतप्रचूर भाषेतून मराठी कविता मुक्त झाल्यानंतर ती मराठीप्रचूर होते ती ग्रेसांच्या कालखंडातच .मी मी म्हणनारे भाषाप्रभू त्यांच्या रूपक,प्रतिमा आणी प्रतिभेशी जुळवून घेता घेता थकतात आणी मग ते सोडून त्यांच्या कवितेतील नाद,भाव याचा आपापल्या अवकाशापुरता आस्वाद घेतात. ग्रेस समजायला ग्रेसीय अभिनिवेषच महत्वाचा आहे. त्या शिवाय मग एकच पर्याय...'ग्रेस दुर्बोध आहेत' असे म्हणने....
कवी ग्रेस हे मराठी कवितेतील एकमेव कवी आहेत ज्यांची कविता ही त्यांच्या उंचिला गेल्याशिवाय कळत नाही. आणी ती कळत नाही म्हणून आपण वाचणे ही सोडत नाही!!
'घडवेन असे मी वृत्त
प्राणांच्या अलगद खाली
अन् करीन पाऊस इथला
शब्दांच्या पुर्ण हवाली' ..
ही ग्रेसीय शैली मराठी काव्य विश्वाला प्रचंड समृद्ध करून गेली आहे. प्रचंड ताकदीचे शब्दसंयोजन,अत्यंत भावगर्भी रूपके, असामान्य प्रतिके, आणी अत्यंत सूक्ष्म भाव टिपणारा व्यापक अवकाश,त्यात एक आत्ममधूर नाद,ग्रेसीय स्पर्श.. सारे अनोखे,अद्वितीय, अप्रतिम,देखणे,अजोड!! ग्रेसांनी मराठी कवितेला,भाषेला एक उंची दिली आहे. अशा अगम्यसुलभ कवी ग्रेसांचे जाणे नैसर्गिकच!! पण तरीही खुपणारे...!
त्यांची कविता एक अप्रतिम देखणे लावण्य घेवून मराठी काव्यविश्वात चिरतरूण बनली आहे.
"दिसे क्षितीज असे की
भास ओळखीचा वाटे
ढग पांगताना मग
हळू चांदणीही मिटे!
२६ मार्च त्यांचा स्मृतीदिन!
अशा भावगर्भी कवीला शब्दगर्भी भावांजली!
कवी ग्रेस यांच्या कवीतेला सलाम!
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
No comments:
Post a Comment