सर्वात शेवटी वाहुन
होते फुलही मुक्त
तेथून मग उमटते
समर्पणाचे सुक्त
होतो प्राण व्याकुळ
अर्ध्य त्याचे जाता
श्वासांच्या भासासाठी
गलबलताना माथा
रिते होऊन निघता
मी पुसत माग निघतो
तुझ्या लाटात बुडणारे
मी माझे फुल बघतो
या फुलांचे गंध कधी
प्राशून तुझ्या लाटा
सोडतील किनारे बहुधा
शोधण्या फुलांच्या वाटा .....
(प्रताप)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२९.७.२०२२

No comments:
Post a Comment