Monday, July 11, 2022

भाव...

येतात तुला हाकांचे
पक्षी भेटण्या दुर
कसला पडे पाऊस
त्याला ओला ओला पुर

वाहते तुझे मनोगत
येते माझ्या कडे
कि भाव असा आर्त
थेट काळजा भिडे

होता अनावर सारे
ढग हळुवार झरती
माझ्या मनास बिलगे
तुझ्या मनाची भरती

मी होई चिंब झाड
थेंबाचा होई पाझर
दृष्ट दिगंती माझी
भेटते तुला ओझर

मी बंद करून डोळे
घ्यावा तुझा ठाव
पापण्याआड तु येवून
निरखुन घे हा भाव!

(प्रताप ☂)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
११.७. २०२२





No comments:

Post a Comment

स्वप्नभंगाचा यमक

माझ्या कवितेचा सखे तू नको तोडू तंतू आणी नको तुझ्या  मनी किंतू परंतू ही भावनेची मंत्रधून  मी रोज करे धावा ही लेप संजिवनी शांतावतो गर्त घावा स...