Thursday, November 17, 2022

शिणला


तुझ्या सावलीचे गाव
उजेडाचे मंद दिप
मी आतल्या खोल तुला
का शोधावे समीप?

तुझ्या सहवासाचे आभास
वास्तवातले दुरावे
हवा घेवूनी कुशिला
किती किती मी झुरावे?

तुझ्या मनातले गीत
शब्द यावा कसा ओठी?
कसे घेईल आभाळ
धरतीच्या गाठीभेटी?

तुझ्या घराच्या वाटा
चोरती का असे अंग?
का बांधतो हा जिव
तुझ्या वाटेचा हा चंग?

तुझ्या जिवाची काहिली
आग पेटते मनाला
उसासून एकोप्यात
जिव अभागी शिणला....

◦•●◉✿ प्रताप ✿◉●•◦
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१७.११. २०२२







Monday, November 14, 2022

झाड कुळाचे


येते असे काही बागडत
मनाच्या रस्त्यावरती
ठाण कोरड्या नयनांनाही
जणू हुरहुर भरती

नसतो सोस तरीही
इच्छा असते दाटून
क्षणात निर्वाताच्या
जाते क्षणभर वाटून

तु यावे कुशीच्या गावा
हिरवा माळ व्हावा
तुझ्या तल्लीन आळवणीत
जिव माझा टाळ व्हावा

सुर भिडावे आकाशी
अवघेची भरून यावे
दुरवरचे एकट पाखरू
पुन्हा फिरून यावे

द्यावी त्याने खुशाली
तुझ्या गोंदण खुणांची
मी व्हावे एक कविता
तुझ्या व्याकुळ मनाची

मी टिपून दव घ्यावे
तुझ्या गवत पात्याचे
तु अनूभवावेत रंगीत
ऋतु आपल्या नात्याचे

मी फुल व्हावे सुगंधी
तुझ्या झाड कुळाचे
आणी चैतन्य व्हावे
गढल्या खोल मुळाचे...

◦•●◉✿ प्रताप ✿◉●•◦
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१४.११. २०२२



Sunday, November 13, 2022

अर्ध्य...


नदीस येतो हुंदका
ती वळणावरती सोडे
मी दोन्ही काठांना मग
घालत बसतो कोडे

ओल्या गवतजुडीवर
मी सोसत असता आग
जळातल्या पाणतळाला
मग हलकेच येते जाग

मी काही बोलत नाही
ओल्या गवत फुलांना
अर्ध्य देवून निघतो
झाल्या चुक भुलांना...

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१३.११. २०२२

Saturday, November 12, 2022

मुक्तीच्या बदल्यातही...


नक्षत्र रेखण्यासाठी
मी हात तुझे मागतो
काजव्यांचे थवे होवून
फुलअस्तरी जागतो

तु उगवत नाहीस नभी
चांदण्याचे घेवून रूप
मी धुनित आठवणीच्या
समर्पी हाकांची धुप

मी गातो अनामिक स्त्रोत
करत तुझा धावा
मी कृष्णकुळातील सुरांचा
होतो व्याकुळ पावा

मी मांडतो सारे संगतवार
तु चुकून येत नाही
पावत नसते अनुष्ठान म्हणत
मनावर ही घेत नाही

तुझा देव तुला पावो
मी काही मागत नाही
मुक्तीच्या बदल्यात ही
तुला त्यागत नाही

नको मला काही
तरी नसते व्यर्थ पुजने
ठरते का हर साली
मग धरतीनेही सजने??

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१२.११. २०२२





Friday, November 11, 2022

सलते....


बिज आपल्या
स्वप्नांचे खजिने
मातीखाली लोटून
मुकपणे झेलते
वापश्याचे घाव...

फुललेले दुःख
गंधीत होवून
इवलेसे झेपावते
आभाळदिशेस रोपटे
बहर त्याचे का नाव?

ते फुलते
ते खुलते
काट्यास बिलगुन दुःख
आकंठ असे का
सलते....??

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
११.११. २०२२











काही वाटत नाही..??


मी टिंब टिंब जोडत
येतो रेखत रेषा
तु धुसरत पायखुणा
खोडत निघते भाषा

मी एक एक शब्दांचे
कसे बांधू सेतु?
सांधू कसे तुझ्या मनाचे
अरण्यकी गर्त हेतू?

सारून सारी मृदा
वृक्ष कसा उगवावा?
बहर मनातील एकट
असा कसा तगवावा?

नकोस बोलू काही
सारे मजला कळते
अंधार दाटला असता
दुःख एकले जळते

तु नकोस घालू बांध
धारेस मुक्त वाहू दे
घे सामावून माझे असणे
सागरा स्थिर राहू दे

सागर निघत नाही
तो सोसत एकला उभा
नदीस विलीन होण्याची
देत मुक मुभा

नकोस मोडू दिशा
रस्ता भेटत नाही
या भांबावल्या रातघडिचे
तुला काही वाटत नाही...??

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१०.११. २०२२












Wednesday, November 9, 2022

एक हसरे...

शुभाशिषी फुलपाखरू
रमते तुझ्या फांदी
कुठल्या फुलबहराची
पंखात निनादे नांदी

धुंद कुंद कळीतले
सोने कसे जतावे?
पापण अस्तरातले
स्वप्न अनाहूत फितावे

लागे जिवास छंद
अश्रुबिंदूच्या तळी
काळजावर उमलताना
तुझ्या भासाची खळी

मन दमून शोधते
तुझ्या फांदिचे आसरे
मग स्वप्नांचे फुल उमलते
मनात एक हसरे

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
९.११. २०२२


Tuesday, November 8, 2022

कर्ण...


माझ्या अंतर्मुख असण्याला
तुझे संदर्भ नसण्याचे
मी गहिरे दुःख धुळाक्षरी
झुळुकीगणीक पुसण्याचे

मी भास गुढ असंभाव्य
मी उगाच उगवला तारा
अंधार तुझ्या पदराचा
दाटून अंतरी ढळणारा

तु अप्राप्य चांदणमंडल
नभी अवचित उगवणारे
अंधार दाटल्यावेळी
नवआस तगवणारे

तजेलदार फुलांचा मी
राजवर्खी असहज वर्ण
तुझ्या आठवांच्या चाकांशी
झगडणारा मी कर्ण....
प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
८.११. २०२२





Sunday, October 23, 2022

मुक दुवा..




चिमणी येते
माळ हसतो
रान फुलावर
रंग दिसतो

हितगुज होते
बहर फुलतो
पंख रंगात
माळ झुलतो

संगत होते
मन जडते
चिमणीचे सख्य
माळाशी जडते

अचानक चिमणी
उडून थवा होते
माळावरची मातीही
मग मुक दुवा होते......

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२४.१०. २०२२







रचनापर्व

Wednesday, October 19, 2022

नकोस....


मी धुसर होऊन असा
गडदाऊ कसे रंग?
ढगास कुठल्या देवू
परतोन्मुख तरंग?

डोंगराची एकट माळ
गाईल गीत कसले?
स्वप्न तुझे शिखराचे येथे
उशास माझ्या बसले

बुडणा-या किरणांचे
कसे गाठू मी मुळ?
की उधळू अवकाशी
थव्यापंखातली धुळ

उजेड हृदयाचा देऊ
की होऊ तमाची छाया?
नकोस पाठवू स्वतःतल्या
स्वतःस मला भेटाया....

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२०.१०. २०२२






Sunday, October 16, 2022

बहराचा जोगी

अस्तचलाकडे बहर
निघता निःसंकोची
दुःख पाझरते मुक
फुलखुडीच्या जागी

गवत मुळातुन
पुन्हा बहरतो
वसंतवैभवाचा
रंगीत जोगी.....

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१६.१०. २०२२



Friday, October 14, 2022

पाऊस परतीचा


नसतो कधी कधी
पाऊस सखा धरतीचा
मग ढगास होणे होते
पाऊस परतीचा.....

देवून सारे निघतो
नसते कसली घाई
धरती अनूभवताना
नवॠतुची हिरवाई

दरवेळी असाच तो
उसासून सारे देतो
हंगामाच्या शेवटी
तो परका परका होतो

गुमान जातो निर्वाती
पायरव न करता
क्लांत निरभ्र होतो
धरतीची ओटी भरता

येईल हाक फिरूनी
पुढच्या ॠतुच्या घडी
तो पावेतो पाऊस माझा
देईल काळीज दडी

झालाच जिव उष्म
माग कधी तु धारा
मी होईन तुजसाठी
पाऊस बरसणारा........

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१५.१०. २०२२




Tuesday, October 11, 2022

बहर वरदान


तुझ्या शहरावर धुके येते
झाकाळली संध्या होते
ढगांना अजाण हुरूप येतो
कुंद फुलवेलींना बहराची
फुलमिठी पडल्याने
कदाचित मोरही
जंगलकपारीत
दगडफुलावर
पेरत असतील गाणे
आणी रिमझिम थेंबाच्या
मृदू स्पर्शात उमटले मोहोर..
माती उधळतही असेल
रानावनावर...
पण दुर खोल जंगलात
एखादी देवबाभुळ
हळदकणातुन उत्सुक असेल
अंधारल्या ढगास
स्वर्णकण बहालीस...
कधी वळतील का तुझे पाय
जंगलवाटा तुडवत?
खोल जंगलातील
झाडांनाही असते बरं
बहराचं वरदान!

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१२.१०. २०२२

Monday, October 10, 2022

सुरेल गीत

बेहिसाब आठवणीस
विसरण्याची असेल का
एखादी रस्म?
हृदयात ही कंपने
स्थिरावत
कुठला ख्यालाची
लोकगीते म्हणू मी ?
एकाकीच कसा पार
पाडू मी हा
आदिम यातुविधी?
ध्वनीत एकात्म
होण्यासाठी
मी विस्कळून
टाकतो आहे
सप्तसुर..
                        आणी हे एक⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀
फुलपाखरू
कुठुन तरीही
घेवून येत आहे
सुरेल गीत?
🦋˙˜”*°•.
༊प्रतापॱ⋅.˳˳.⋅ਏਓ ઇଓ
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
३.१०. २०२२



Sunday, October 9, 2022

चंद्रज्योती



चंद्र आला सखे!
उजळत तुझी काया
अंथरली मी ओंजळ
आभा तुझी धाराया

उजळ चंद्रज्योतीतुन
मोतीपवळ्याच्या राशी
तुळसमंजिरी हसते
दिवेलागणी दाराशी

ये! सारेच उजळत असे
तम सोनधुके भासावा
चकोर व्याकुळ होवून
चेह-यास तुझ्या ध्यासावा

शुभ्रधवल ढगाला
जसे लाभले सोने
उजळून दे समग्र
जगण्याचे गडद कोने....

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
९.१०. २०२२




Friday, October 7, 2022

रेषा...


सायंतारा सांजवेळी
शोधतो नभात 'ओरवा'
मनात भरून येतो
आठवणींचा मारवा

तु मी जरी मिसळलो
नभात उमटते रेषा
दिवसात मिसळण्यापासून
वंचीत राहते निशा

सांजेचा धुसर पुल
एकमेव आपले सांधण
शब्दात माझ्या उतरते
तुझे नक्षी गोंदण

ओलांडावा कसा
या परिघाचा फेरा?
धरतीस कसा बिलगावा
दुर नभीचा तारा?

जळतो दिवा तरीही
अंधार साचून येतो
हा बाण कसा जिव्हारी
हलकेच टोचून जातो

मी राखतो तरीही
तु आखली लक्ष्मणरेषा
आस पाठवून देतो
तु नसल्या दुरदेशा....


प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
८.१०. २०२२












आत्मभानाचे अर्पण


माझ्या शब्दावर तुझे
आभाळ उतरून टाक
कवितेला येईल मग
तुझी धुसर झाक

शब्दांची धरपकड कर
त्यातले अर्थ शोध
होईल तुला गर्त मग
व्याकुळ अर्थबोध

निशीगंधासम मोहोर
पुन्हा बहरून ये
माझ्या गावाच्या कवितेत
मनसोक्त विहरून ये

राती निजेस जाता
कवितेने कुशी उजव
माझ्या शब्दांना मग
ओल्या आठवांत भिजव

शब्दांचे पोत तपास
पाहूनही घे जडण
हाती तो तो लागत जाईल
तुला तुझीच घडण

नि:श्वास,हुंदक्याने
सिंचीत रहा हे रान
माझी कविता बहरेल
तुला अर्पित आत्मभान...

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
८.१०. २०२२












तमशलाकेत....



या उजेडभासी राती
तळे निजत नाही
ही कसली धुनी अंतरी
विझता विझत नाही

या तमशलाकेत रूतते
चांदण्याची हाक
चंद्रास ही बिलोरी
तुझ्या नयनाची झाक

अवगुंठते वा-याची
वाहण्याची भाषा
अंधारावर तुझ्या
ओढ आभाळाची रेषा

रेषेच्या रोखाने
गाठ तु टिंब
तळाशी साचलेले
पुर्ण चंद्राचे बिंब

सारे सारे तपशील
देती तुला हाक
कवितेला माझ्या
तुझ्या चांदण्याची झाक

उभे कशासाठी कोण?
देत उजेडाचे दान
माझ्या शब्दांना पुकरते
तुझी मुक मुक आण

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
७.१०. २०२२










Wednesday, October 5, 2022

हिरवे उधाण


माझ्या गगन हाकेवर
उधाण हिरवे येते
शिळ अंतरीची
मग चंद्र चांदणे होते

एक सुबक तारा
हसतो सांडत आभा
हृदयात साठवणुकीची
देत नाजुक मुभा

मन पिसारा होते
सजवत आपली काया
हिरव्या ढगात उमलते
गुलाबी चांदणमाया

नजरेत चमकतो चंद्र
स्मितात मधुच्या धारा
आभास कुशीत मोहरतो
पाहून हसरा तारा....


༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
५.१०. २०२२




जळण्याचे तिलीस्म



कुठल्या परगण्यात
कुठल्या गावा
शोध कसा हा
पुर्ण व्हावा

ह्या फुलाचा असा
कुठला आहे वाण
ॠतु येण्या जाण्याचे
याला न राही भान

चालता अंतर सरते
पाऊल निघत नाही
ही कसली भुल पापण्याला
सहजी बघत नाही

मी विसरत नाही वार
हंगामाचे तुझ्या ओले
ऐन फुलघडीचे माझे
कित्येक बहर गेले

येवून जातो वणवा
सहजी शमत नाही
छंद अरण्यास माझ्या
त्यालाही गमत नाही

ये धडाडून व्यापत
करत सारे भस्म
कळेल तुलाही सुख
अन् जळण्याचे तिलीस्म.....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
५.१०. २०२२








काट्याचे दुःख


बाभळीच्या काट्याला
काय असेल टोचत?
टोचण्याचे दुःख कसे?
ही व्यथा असेल जाचत

वेदनेच्या कळवळ्याला
तो अभागी वंचित
दुःख अनावर त्याचे
कसले त्याचे संचित...

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
५.१०. २०२२





Sunday, October 2, 2022

स्पंदनभुल


सांज अवतरे मृगजळी
थवा घरट्याचा तृष्ण
अशा शामली वेळी
बासरीतुन निवतो कृष्ण

अवकाशी लाली पसरे
आरक्त गोकुळ होतो
गायगळ्याची घंटा
उत्सुक पायरव होतो

निरंजनाचे हृदय
जळून वात उजळते
आभाळावर रवीचे
मन सांय ढवळते

अशा अवघड वेळी
आठवे चांदणझुल
हृदयास माझ्या पडावी
तुझी स्पंदनभुल....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२.१०. २०२२





Saturday, October 1, 2022

तृष्णमुरारी


ये असा अंतरी माझ्या
जणू शेवटली पाउस सर
ओल्या ओल्या गहिवराला
कंचओले पुन्हा कर

धारून घेवू दोघेही
धरतीचा तृष्णमुरारी
रूजवून प्रित अंतरी
घेवू ढग भरारी

ध्यानीमनी नसता
तो अनाहूत दारी पडतो
अशा ओल्या प्रितीचा
प्रसंग क्वचित घडतो

मी नाही धाडत मेघदूत
अंतरात्मा माझा सांडतो
माझ्या काळजाचे ओले पाऊस
तुझ्या छतावर मांडतो.....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१.१०. २०२२









आठवांचे खडाव


गोरजधुळ आसमंती
भेटीचे पाझर ओले
गोठ्यांचे काळीज पान्हा
बासरीचे सुर निघाले

एकांत ग्रहणावेळी
हलकीशी चाहूल भिडते
गोठ्यामागे कोणी
मुक राधा रडते

आठवांचे खडावांना
पाऊल कुणाचे देवू?
हंबरलेल्या हृदयाला
चाहूल कुणाची वाहू?

फुलव संध्यासमयी
माझ्या अंकुराचे पोत
एकल्या जिवास भेटते
तुझ्या आठवांचे गणगोत

मी अंधाराच्या खाली जपतो
चंद्रमुखी फुलांचे ताटवे
या घनघोर एकांत वेळी
चंद्र तुझा बघ आठवे

नकोस देवू अमावस
सोनेरी पुनव राती
तुझ्या प्रकाशबिजासाठी
उत्सुक असता माती....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१.१०. २०२२







Friday, September 30, 2022

रातीच्या अंधाराचे


अंतरंगातील जाणिवांचे
कसे रूप साकारू?
तु नसल्या पोकळीत
काय असे आकारू?

नसते तुजसम काही
मजला गमत नाही
नुसते भास कितीदा
जिव त्यांच्यात रमत नाही

व्हावे झुळुक लकेरी
तुला स्पर्शुन यावे
हा ही भासच अंधूक
तरीही हर्षून जावे

ये ना कधी दीठीला
आस किती राखावी?
अंधाराच्या भिंतीवर
कितीदा तु रेखावी

आकार साकार दोन्ही नाही
तरीही पुकार चाले
रातीच्या अंधाराचे अगणित
भग्न शिल्प झाले.....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१.१०. २०२२





Tuesday, September 27, 2022

पाखरे...


आभास मजला तुझे
असे भेटावया आले

येती जसे पाखरे
संध्याकाळी झाडावरती....


༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२८..०९. २०२२


Monday, September 26, 2022

अश्क..


फकीर - यूं अकेले बैठकर
लगता नही तुम्हे तनहा?
मी - नही । बिलकुल नहीं ।
फकीर- कमाल।
कितना झुठ।
मी - बाबा!
खोटं नाही खरंच!
फकीर- कैसे?

मी - सितारो के हुजुम मे
चाँद कहा अकेला?
वो एक शख्स होके भी लगे
मुझे राहगुजर काफिला ।

नसले जरी कोणी
ती असतेच असते आत
अवकाशाच्या आतील
ती पहाटप्रहरी प्रभात

संवाद माझा नित्य
तिच्या संगती चाले
मी तारेही वेचून घेतो
अवकाशी नसलेले

जरी बहर माझे भासती
हंगाम चुकलेले
भेटते मला ती नित्य जसे
वहीत गुलाब सुकलेले

फिर फिजूल कैसे मेरा
यंहा बैठना अकेला?
जब हरदिन लगता दिल मे
ख्वाबों का उसके मेला।

फकीर- कभी रोया भी होगा वो, तेरे दर्द से लिपटकर?
तुझे बुरा नही लगा?

मी - बाबा ...
अश्क अश्क होते थे ,मै थम जाता था।
अश्क हसरत बनें,मै बहता रहता हूँ ।

फकीर - बहकर?

मी - मिलता हूँ उसे,नदी की तरह
और मुझे ओ समंदर बनाता है ।


༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२७..०९. २०२२














Sunday, September 25, 2022

सिसकी


फकीर - दिख रही है तुम्हारे
लब्ज क लिखावट
सिसकियाँ लगती है
किसी अनजान की।

मी : इरादा तो नही होता
की ओ पढे और रोए
बस सुनकर मेरी सदा कभी
ओ रोशनी सा लौट आए।

रस्ता तुडवत निघती
माझे शब्द अनवाणी
भासते का इतरांना
दुःखी एक विराणी?

शब्दांनाच भाग्य ते आणतात
तीला हात धरून....

फकीर- उसे कैसे पता चलेगा
तेरा दिल जलता है?
उसीकी याद से तु
हरदम मिलता है?
मी- बाबा!
ओ बिछडा है जरूर
दिल तो है पिछे छुटा।

फकीर- कंहा ?

मी माझ्या हृदयावर हात ठेवून
ऐकतो आहे स्पंदन...मुक होऊन

फकीर- और तुम्हारा दिल?

मी- वही तो पूछता हूँ मै उसे सदियों से।
फकीराचे हृदय का भरून येत आहे?
दुःखी,आनंदी,भिती असताना
अचानक उर भरून येते तसे.....?


༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२६..०९. २०२२






समा


फकीर
अस्वस्थ होत आहे
पुटपुटतो आहे
'खफी' मनातल्या मनात
'तुम अलग हो'
जुदा हो हमसे
फिर भी दिल
जुड गया ।

मी: बाबा!
जुदा कैसे?
मै भी आप जैसा ।
माझ्यातही आहे एक 'दरवेश'
जो करतो नित्य 'जियारत'
माझ्याच 'मजारी' ची..
आणी 'माझ्या' हाकांचे 'उरूस'
मी रोजच मनवतो
मेरा 'तरीका' ओ है,
मेरा'सिलसिला' भी ओ।
बस बुलाता नही मुझे ओ
कधी आपल्या 'खानकाह'वर
मी 'मुरिद' आहे तीचा
हे माहिती असुनही
फक्त बनत नाही ती माझी'मुर्शिद'!

फकीर - 'समा' गाने को दिल कर रहा है अब ।
'समा' जानते हो?
मी : बाबा जर मी म्हणत असेन
आपण आहोत सारखे
कसे होऊ आपण
शब्दा पासून पारखे?

तुम्ही समा गा आर्जवे करा
माझी कविताच माझी समा
इबादत माझी अमिट मला
जन्नत,जहन्नुम ची न तमा ।

मै तो बैठता भी हूँ
देखकर उसकी छाँव ।
मी पुजताना तिला हृदयातुन
जततो सुन्नत भाव.
फकीर - पुरे अवलिया हो।

मी : काय माहिती कोण करेल
माझी शिफारीश?
मी 'सलाम'ही करतो
फक्त तिलाच !!
फकीर: इबादत सच्ची है तुम्हारी।
मी : लेकिन सब्र कबतक??

फकीर- तेरा खुदा जाने।
तु जाने ।
तो गातो आहे 'समा'
माझ्या व्याकुळ गीताचे शब्द घेवून....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२६.०९. २०२२


डंख..


दुःख तुझे उराला
भेटते बोचणारे
मी चुंबुन सुळ घेतो
मनाला टोचणारे

बैराग कथेचे निरूपन
जोग तुझा अधुरा
खोल तळाशी तुझ्या
झुरते का अधिरा?

अशा भुकेल्या वेळी
तोडते कोण पान्हा?
दुर अवकाशी भरारी
घरटे टांगताना..

ये ओंजळीला
पसरून तुझे पंख
उचलून घे दाणा
ठेवून जा डंख......

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२५.०९. २०२२




फुलपाखरूपण..


हृदयस्था!
तु कवितेतलं
फुल बदल म्हणालास..
मी ऐकलं..
पण तुझ्या गंधास
पारखी झालेली माझ्या
शब्दांची फुलपाखरे...
अडखळताहेत
त्यांचा
होतोय दिशाभ्रम...
कसंबसं साजरं
करताहेत ते
फुलपाखरुपण ....
पण अधून मधून
ते पाहतायत
आशेने माझ्याकडे....
आणी मागताहेत एक
नाजूक वचन....
तु बाग सोडणार नाहीस याचं...
मी ते वचन द्यावं
तुझ्या वतीनं
इतपत परिघ तरी
दिलायस ना मला??

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२५.०९. २०२२






शब्दनिळ...

मी शब्दनिळ होऊन
सुर राधा छेडले
यमुनेचे पाणी हसरे
नयनी जेंव्हा भिडले

झाड शहारे अवघे
जेथे शाम टेकला
मार्गस्थ होऊनी ठेवी
मागे सुर एकला

राधा काढत माग
वृदांवनी फिरते
ओठांच्या काठावरती
स्तब्ध बासरी झुरते

शाम सुर पेरतो
व्याकुळ आलाप येतो
मंद झुळुक स्पर्शता
राधेशी मिलाफ होतो

हसते राधा एकली
नयनी शाम रडतो
अवकाशाच्या परिघावर
मोरपंख अलगद उडतो...

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२५.०९. २०२२









Saturday, September 24, 2022

सहमुक्ती....

व्याकुळ व्हायचे नाही म्हणून
मी गाठतो आहे तळ
जिथे तुझी हाकही
पोचणार नाही

हे अंधारे रस्ते तुडवत
मी ओलांडले आहे
निनावी बनून
सप्तपाताळ...

या एकाकी अंधारास
सरावत माझे डोळे
शोधताहेत मिट्ट
काळोखाचा कोपरा

या निशब्द मुहूर्तावर
मी स्थिरावलो आहे
अशा जागी जिथे
मी मलाच दिसू शकत नाही

तुझ्या वियोगाचे आलाप
त्यागायच्या इच्छेने
मी पापण्या बंद करून
मोजतो आहे माझे श्वास

आणी समाधिच्या
पहिल्याच पायरीवर उभे राहून
तु बोलावते आहेस हसत
एक हात पुढे करून....

मी तुला सोबत
घेवूनच
आता होऊ पाहतो आहे
मुक्त.....!!

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२४.०९. २०२२




शब्दकुळ....


सुन्न मनाने फकिर
स्वगतात पुटपुटला....

खाक हो जाता है पतंगा
दिए की लौ छुकर
शोर यूँ ही नहीं मचाती
तेरी ख़ामोशी बढचढकर।

बोलो कहाँ से लाते हो
इतनी शिद्दत
अपनी गीतों में?

मी हसलो मंद... म्हणालो,
बाबा !
नावेत वियोगाची बासरी
वाजवायचा राँझा
आणी महिवाल माळावर
गायचा आर्त गीते
त्याचा उगम जेथुन
तेच माझे कुळ....

फकीर- मतलब उसको हिर, सोहनी सरिका समझते हो?
मी - आदाब हिर सोहनी को
ओ तो उससे बढ़के
मै जन्नत पाता हर दिन
उसकी नज़्म पढके।

राँझा ची बासरी, महिवालची गीते
माझे शब्द त्या कुळाचे
सोहनीसह मडके वाहिले
बहुधा त्या जळाचे......

फकीर - बरखुर्दार । बह जाओगे ।

मी : वाहताहेत माझे शब्द
चिनाब चे काठ
मी चितारत आहे रंगाने
सोहनी घरचा माठ

माळावरती गातो आहे
हिर चे राँझा गीत
ही नज्म माझी शिकवेल
तिला प्रेमाची आर्त रित

भेटेल ती माझ्या गीताला
जेंव्हा काफीला गाईल गाणे
पहिल्याच शब्दास थबकून जेंव्हा
ती उघडेल दार अधिराने......

फकीर - रूहानी.........

मी बुडतो आहे तिच्या आठवणीत
एक व्याकुळ गीत म्हणून वर येण्यासाठी....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२४.०९. २०२२















Friday, September 23, 2022

नाजूक धडे


कोणी रडवतं
कोणी घडवतं
कोणी खुली किताब
कोणी दडवतं...

असतं तेच!!
जे असते दोन्ही कडे
प्रेम शिकत जातं दुराव्यातुन
समर्पणाचे नाजूक धडे

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२३.०९. २०२२





विलापाचा धिर


वेदनांचे बहर हृदयी
तुझा ऋतु बहुधा आला
अश्रुफुलांच्या पायतळी
स्वप्नांची ओली माला

रंग कोणते उधळू?
गाऊ वसंत गीत?
जडवून घेण्या तुझ्या
बहराची दुर्मिळ रित

झाडालाही असते हृदय
धडधडणारे हिरवे
तरीही दिगंत गाठती
रमलेले हसरे पारवे

झाड उडत नाही
पक्षी नसती स्थिर
किती धरावा झाडाने
विलाप सोसून धिर..?

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२३.०९. २०२२



पुरेल...


नकोस जागू
दिवे मालव
खिडकीवरल्या ढगाला
डोंगरा पल्याड घालव

जाईल तसा ही दुर
एकांती तो उरेल
दिली वेदना वाहण्या
उरले ढग पुरेल.....


༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२३.०९. २०२२



बहुधा....


टप्पोर चांदण्या समक्ष
अनाहूत ढग आला
रातीच्या अंधाराची
ऊंचावत डोंगरमाला

वाकिफ हो?
इश्क कब मुकम्मल
होता है? - फकिर
हां!
जब इश्क पे सही
अमल होता है । - मी

फकीर - तो मिलों उसे।
करो अमल ।
कब तक अंधेरे मे
युं ही बैठे रहोगे?

मी : करतो तसाही विचार!!

निकलता हूँ उस तरफ
लेकिन उसे मिलता नही।
जानता हूँ मै पराये डाल पर
फुल वैसे भी खिलता नही।

ति अता करते अंधार
स्वप्नांचे दिवे मालवून
मग मी मलाच देतो त्यावेळी
परिघा बाहेर घालवून..

फिर उसके बेख्वाब अंधेरोसे
अकेले रोज गले मिलता हूँ ।
चराग हूँ आबाद रोशनी का
बेलब्ज जला करता हूँ ।

करीलही ती रफू हृदय
सुली से उतार भी देगी ।
तब उसकी भरी आंखों मे
इश्क की रोशनी होगी ।

अलवार विरताहेत ढग
चांदणे जळते आहे
दुःख बहूधा माझे
तिच्या हृदयी उजळते आहे....

फकीर - शायद ।

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२३.०९. २०२२


















चिरंजीवी आस

बसलो आहे दोघेही
एक भरलं रितेपण घेवून
खोलतो आहोत अंतःकरण
मौनाचे साज लेऊन...

अवकाशात स्थिरावलेली
ओलांडत चांदण नक्षी
उडतो आहे रातव्यात
एक आनंदी पक्षी....

पाहून त्यास मी
उदासे हसतो आहे
फकिरासही तो
अंधुकसा दिसतो आहे..

फकीर - अच्छा! बताओ तुम दोनो के बारे मे ।
मी : बाबा रहने दो।
फकीर - क्यों? बता नही पाओगे?

मी : ओ पंछी है जो मुझे
पीछे छोड गया।
आणी मी... ते
मागं राहिलेलं घरटं!

फकीर- यह तुटता तारा देख
कोई मुराद तो बोल ।
मी : फलकसे टूटते तारे
दुबारा थोडे ना जुडा करते हैं
निकल गए पंछियों के पिछे
घोंसले थोडे ना उडा करते है।

हाँ । मै विरान हूँ
छुटा हुआ घोंसला हूँ ।
फिर भी मै उस सितमगर के
सब्र का हौसला हूँ ।

फकीर - तेरा दर्द ही
अब तेरी दवा ।

वेदनेच्या अत्तरातुन
का होतो मला तुझा भास?
इतकी चिरंजिवी का असते
मजला तुझी आस?


༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२३.०९. २०२२















Wednesday, September 21, 2022

कधीतरी दुवा ......


शायद..माझी तपीश
फकीरास वाटते आहे अजान
तो करतो आहे तयारी
त्याच्या 'सुन्नह नमाजची'
किबल्याकडे चेहरा करून
त्याने नजर गढली आहे जमीनवर
त्याचा परवरदिगार पाहतो आहे
त्याच्याकडे थेट
ही जाणीव उजळत.
एक एक 'रकअत'करत
तो म्हणतो आहे 'तकबीर'
आणी पढतो आहे दुवा
त्याची नेअमत साधण्यासाठी
शायद माझ्या तगमगीतुन
मुक्त होऊन तो मिळवतो आहे
फलसफा - ए- नमाज...

इकडे मीही
अश्रुने करतो आहे वजु
एक एक रकअत पार पाडत
मी ही आरंभतो आहे
तुझी प्रार्थना...
तुझी नेअमत मिळवण्यासाठी
तुझ्या दिशेला किबला मानून
मी ही गढवतो आहे नजर
चांदण्यावर....
तु थेट पाहत असतेस चांदण्यातुन
माझ्याकडे समजून...
उंचावल्या हाताची ओंजळ पसरून
माझा खालिक तु असतानाही
मी मागतो आहे
तुझ्या साठीच दुवा.......

फकिर संपवतो आहे नमाज
फिरवतो आहे हात स्वतःच्या
चेह-यावर रूहानी धारत

आणी मी .....
माझे उंचावल्या हाताची
ओंजळ चेह-यावर फिरवण्याठी
शोधतो आहे तुझा चेहरा.....

अशाने माझी
रकअत नाही होत पुर्ण....
मग रहावं लागतं मला
सजद्यात कायम.......
करायला हवी ना तु माझी
कधीतरी दुवा कबूल?

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२२.०९. २०२२







दरिया



भिजल्या दवांच्या
गवत रजईवर
हळुवार पाय पसरत फकीर
विचारतो आहे....

साद देतो आहेस आर्त
क्या ओ मुकर गयी?
वैसे कौन थी वो?
कहा ओ चली गयी?

बाबा! रहने भी दो...
बहाव को कौन रोकता है?
नदी थी, बहना जानती थी ।
लाख कोशिशों के बाद
कहाँ ओ मानती थी ।........मी

फकीर - मग का बसला आहेस तु?
ही स्थितप्रज्ञता धारून..?
मी : बाबा! आपने कभी नदी को
दरिया से मिलते देखा है?
फकिर- तेरा मतलब ?
मी : उसकी याद को मै
ज़रिया बना रहा हूँ,
खुद को ही मै अब
दरिया बना रहा हूँ ।

फकीर - मुकर्रर ।

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२२.०९. २०२२






नियतबध्द


मी नदी बनून
वाहतो आहे
तुझ्या अथांग
सागराकडे..

धावतो आहे मी
काट्या कुट्यातुन
रानावनातुन
जंगल कपारीतुन
दरी खो-यातुन
उन वा-यातुन...

बदल्यात या
तु देशील काही
लाटा म्हणून

कारण माहिती आहे
समुद्रास नदी दिल्याशिवाय
तो लाटाही देत नाही....

पण मी त्याही पलीकडे आता...
मी वाहतो आहे
तुझ्या कडे
माझे नियतबध्द
प्रारब्ध म्हणून...


༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२१.०९. २०२२




Tuesday, September 20, 2022

कश्मकश...


नितळ चांदण्याखालचा संयत तळ ढवळत
फकीर म्हणाला,

यादों का मुसाफ़िर बन तुम
बैठते हो नित सितारो के निचे।
हैरत है कोई कैसे इतना
किसी का इंतजार करता है ।

शांत वाहता वारा,
अवकाशी एकटाच विहरणारा
रातपक्षी..आणी त्याची
निरवव्याकुळी शिळ...
मी म्हणालो,
बाबा!
ओ दस्तक न देता
तो दिल आह भी नही भरता।
ओ गले नही लगाता और
 मुझे रुख़सत भी नही करता।

फकिर: शायद कश्मकश...

मी: हं तिचेही व्याकुळ मन
असेच दुखत असेल
ती ही कळवळून अशीच
सजद्यात झुकत असेल

फकीर: तपीश-ढाल दिल है तेरा
आग झेलता है ।
मी : तौबा!आग तो मै ले लू
उसपे आँच ना आए ।

मग फकीर ही नि:शब्द...
मजसम चांदण्याखाली

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२१.०९. २०२२





परिवलनीय....


होईल कसे पूर्ण
हे परिभ्रमण माझे?
तुझ्या परिवलनातुन
मजला मुक्ति मिळत नाही !!

कललो आहे मी
तुझ्या अक्षाच्या दिशेने
मोसम त्यामुळे येते
मी कदापी रोखत नाही!!!!


༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२१.०९. २०२२

परिंद...


"साया भी नही उसका
तसल्लियाॅ कैसे पाते हो?
रोशनी मे गुम होकर
रात मे उसे ढूंढने आते हो ।"
अचंबित होऊन
फकीर म्हणाला..

एक दिर्घ कळ
मनात शिळ वाजवताहे ...
मी म्हणालो,
"हे तम तिला शोधन्या
घालते मजला भरीस
अंधार सोने होतो
हाती चांदण्याचा परीस

नसो सावली मागे
जरी मी एकला
अंधाराच्या काळजावरतीच
तो चेहरा मी रेखला"

हां हां शायर फिर भी...
रात मे ही क्यों ढुंढते हो उसे?
सूरज थोडे ना तुम्हे
करता है मना?....-फकीर

काळीजकळ सांधत
माझे शब्द हवेत झेपावले...
" बाबा! परिंद शाम को ही लौटते है,
अपने घोसले मे ।"

फकीर : दुरूस्त फरमाया ।

तो ही उलगडतो आहे आता
अंधाराचे पट
कदाचित रेखतो आहे तो ही
त्याचा रब तमाच्या काळजावर.....!!

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२१.०९. २०२२

Monday, September 19, 2022

आमिन...


न राहवून फकीर.....

क्यों नही करते तुम
जिक्र ए जुदाई ?
दिल तो हमेशा तुम्हारा
देता है उसे दुहाई ।

उम्रे बित जाती है
पत्थर भी रोता है।
बिछड़े कोई तन से
रूह से तो अपना होता है ।

परिंदे को बता
तेरे मन की बात
बेचैनी का मंज़र
और ए तनहा रात ।
...
निःश्वास टाकून मी...

बाबा!
तो तरसही खात नाही
बेईबादत चुप ही राहत नाही
बेशक ओ गया ...
लेकीन आँखो मे ही रह गया

व्यापला तिने अवकाश
भारली आहे समग्र भुई
कशास करू मी जिक्र उगाच?
बात मुह से निकली और पराई हुई...

मला तिचा भाव पण
करायचा नसतो विलग
है ही ओ सबसे जुदा
सबसे ...अलग....

फकिर- दश्त भरा दिल लेकर
कब तक सैलाब रोक सकोगे?
मी: एक तो कयामत
या वो आने तक...
मेरा सैलाब भी उसीकी
बाहो का दिवाना।

फकिर : पागल है तु पक्का ।

मी : बाबा ... यह कहकर
आपने उसकी याद ताजा कर दी
शुक्रिया ।
फकिर : या अल्लाह!
इस दिवाने को सुकून फरमा ।
मी हसतो आहे "आमिन" म्हणत....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२०.०९. २०२२



उजेडाचे टाहो


बंद दाराच्या बिजागरीस
चाहूल कुणाची वाजवे?
आभाळातल्या चांदण्यावर
मी उधळले मग काजवे

अजूनही जागते रात्र
नक्षत्राची घेवून आस
सप्तर्षी ता-यातुन मजला
चेह-याचा तुझ्या भास

मी काढत माग निघता
रस्त्यास पडे ना भुल
तु अवकाशी खोचलेले
उत्तरेस ध्रुवाचे फुल

मी ओंजळीत झेलून घेतो
एक तुटता तारा
हा क्षण तमाचा दाटे
स्वप्नही न पडणारा

पहाटेला तारा ढळतो
निज तुझी का तुटते?
का त्यामुळेच अवकाशी
उजेडाचे टाहो फुटते?

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१९.०९. २०२२



हमरूह....


शहारला फकिर म्हणाला
"है तेरा हर मिसरा
आरजू की रवानी
तेरी बेपनाह दिवानगी
समझती भी है दिवानी?

पहेलियाँ कितनी बुझाएगा
कभी मिलेगा भी रास्ता?
तेरे हर लब्ज़से छलकता
बस प्यार का वास्ता ।"

-हं, लिहतो मी
ही तिचीच तर इनायत
पापण्यात समुद्र राखणे
कसब उगाच का लाभले?....मी-

"समजते तिला सगळी
माझ्या शब्दांची घडण
या सखोल भावगर्भाची
ती आर्त वळणी चढण

हर शब्दांचा आत्मा
तिचे गीत गातो
तिच्या हरल्या नि:श्वासाची
मी व्याकुळ जीत होतो

माझा रस्ता ही तीच
तीलाच शोधण्यासाठी
हा भाव माझा टाक
पाषाण भेदण्यासाठी

फुटतील पाषाणास गीते
येईल वा-यावर संगीत
ही आर्जवे व्याकुळून होतील
बंद पापण्याआड मग रंगीत

फकीर: गाता रहे तु हरदम
तराना ए प्यार का,
तु हमरूह बन गया है
तेरे बिछडे यार का ।
मी: हं ! बहुधा....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१९.०९. २०२२


Sunday, September 18, 2022

शब्दांचा आत्मा


तो फकिर म्हणाला
"इस शब-ए-गम मे तुम्हारे हर्फ
शायद दरिया से आते है ।
शायरी तो है तुम्हारी लेकिन
ए लब्ज़ किस रूह से आते है?

मी हसलो मंद चांदणे पाहत...
म्हणालो....
"बाबा ! सुरज बुडतो.. नंतर..?
चराग धावून येतो..मग?
तो ही विझतो झोपताना मग ?
जुगनू येतो चमकतो
तो ही जातो त्याच्या ठिकाणाला...
राहतं ते चांदणं..
अविरत साथिला....."

मतलब?- फकिर

"तो रात्र देतो तमाची मग देतो
साथिला प्रकाशी चांदणे
ती ही अशीच देवून गेली
आठवणीशी एकट नांदणे

मी वेचतो शब्दातुन उजेड
जो चांदण्याच्या असतो ठायी
पार होते नित्य मग रात
अन् ही आठवणीची गर्त खाई

हो ! लिहतो मी काव्य
तीच शब्दांचा आत्मा
तिचे शब्दात माझ्या असणे
जणू चराचरात परमात्मा!!" - मी

माशा अल्लाह!
माशा अल्लाह! - फकिर...

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१८.०९. २०२२









असंभवनीय रेषा


मला नित्य
साकारायचं असतं
एक देखणं महाकाव्य
तुझ्यासारखंच....
तेही तुच ओढल्या
तुटक.. गडद
रेखल्या,खोडल्या,
स्विकारल्या,नकारल्या
जवळ घेतल्या
दुर ढकलल्या
रेषेच्या
आडोशाने....
मी होतो तुझी
अशी असंभवनीय रेषा
मग शब्द येतात
तुझी प्रतिकंही
आणी मग मी लिहतो
तुझ्या नसल्या
तपशिलाचे
अदमास घेत
एक व्याकुळ महाकाव्य ...


༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१८.०९. २०२२







अंतरात...