Saturday, December 31, 2022

हाकेची आकाशगंगा


काळ चालतो आहे
....अनादी पासून
अनंता पर्यंत.....
आपल्या घटिक गतीने
एकेक युगांचे
तो घेतोही विसावे क्षणीक..
आपले चक्र
स्तब्धवून...!

त्याची सहयात्री
म्हणून तुला दिलेली
माझी हाक
ती ही चालते आहे
अनंताचा प्रवास...
अनादी पासून
अनंताकडे...

त्या माझ्या हाकांचे
हरयुगीन काफिले
संचित करून
काळ बनवतो आहे
एकेक आकाशगंगा
आणी पसरवतो आहे
प्रदिर्घ अंतराळात
.... हे अंतराळ असेच
विस्तारते आहे माझ्या
हाकेगणीक....

आणी तु......
तुझ्या नजरपशात
येऊ एवढ्याच
या आकाशगंगेतील
तारकांचे लावते आहेस
अन्वयार्थ
कसले बसले नक्षत्र बनवून...
कधी शततारका,
कधी विशाखा,
कधी हस्त,
कधी चित्रा
कधी रेवती
कधी धनिष्ठा
असे काहीबाही
नामाभिधान देत..

या हाकांच्या
अनंत आकाशगंगा
कधी पाहशील तु
ओंजळीत घेऊन एकत्र?

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१.१.२०२३







चंद्रांतर.....


सांजबुडीच्या वेळी
एकांत विरळ विरतो
मी चंद्र एकला होऊन
तुझ्या घरावर फिरतो

पानाची जाळी शुष्क
अनाथ पडते रानी
रात मुक्याने गाते
नक्षत्रांची चांदणगाणी

चांदसखा मी होऊन
असतो उजाड जागा
शब्दांचा आत्मा जळतो
होऊन वातीमधला धागा

शब्दांचे मनोरथ माझ्या
उजेड होण्या जळते
दुःख आवेगी त्यांचे
तमास तुझ्या का कळते?

कवितेस या माझ्या
दे ना चांदण काया
दे पांघरून तिजवर
तुझी मलमली माया

शब्दास भिडु दे माझ्या
तुझ्या आत्म्याचे मन्वंतर
मी सांधून घेईन सत्वर
चंद्राचे सुदुर अंतर....

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
३१.१२.२०२२






Friday, December 30, 2022

रावा हाक


हिरवे रावे गातील
पर्णहीन तरूंची गाणी?
किती ॠतु सोसावी
ही बहराची मनमानी?

पहाडांच्या काठावरती
धुके उभे का असते?
शिखराच्या माथ्यावरती
दुःख एकले बसते

मी हाक कशाला देवू
दरीत दुःख घुमते
झाडांच्या सावलीचे
करडे मन दमते

शिळ देत नाही
असला कसला रावा?
मलाच समजत नाही
तुझा मृगजळी कावा

मी नभाच्या कोप-याला
वचन कशाला देवू?
तुझ्या खिडकीतला रम्य
तारा कशाला होवू?

तु नभ बनशील तेंव्हाच
मी बनेन सप्तर्षी तारा
आणी धारेनही रंग
तुझा चमकणारा.....

प्रताप
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
३१.१२.२०२२










ओल्या चिमणीचे थवे



ओल्या चिमणीस रे!
द्या आसरा कोणी
मनी शांत खळाळता
भुगर्भातील पाणी

ओल्या हळदखुणांचे
ठसे कसे मोडावे ?
रातीच्या भुलवप्रहरी
स्वतःस कसे सोडावे?

शब्द थव्याचे गाणे
चांदण्याच्या कंठी फुटते
दुर उभ्या झाडाचे
फांदिवर काळीज तुटते

भग्न भिंतीस पाठमोरे
कोण उभे एकले?
माळावर कोणाचे डोळे
पाहुन वाट थकले?

फटफटेल पहाट म्हणूनी
तारे मंद का विझती?
शिणलेले काजवे कोठे
अनाथ एकले निजती?

मी विझता तारा घेवून
सकाळ पेटवून देतो
ओल्या चिमण्यांचे थवे
फांदिहून उठवून देतो...

प्रताप
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
३०.१२.२०२२












Thursday, December 29, 2022

कवितेचा फुलगंध...


शिशिरदिशेला निघतो
स्वप्नकाफिला माझा
दुःख उरात दडते
न करता गाजावाजा

अवकाशी उगवून येती
सप्तर्षी चांदणराशी
मी उभा विराणी गातो
तुझ्या एकट वेशीपाशी

कोण मुसाफिर म्हणूनी
ये तुही मग अनवानी
प्रतिक्षारत ही वळणवाट
न होवो.... दिनवाणी

दे पसाभर वास्तव
स्वप्नांची भरण्या झोळी
आणिक अंधार सारण्या
काजव्यांची एकलटोळी

नकोस पाहू चेहरा
आभास स्पर्शही टाळ
या शब्दफुलांच्या वेणा
देवहारातुन माळ

वाहून दे ही फुले
तुझा देव्हारा सजव
आवडलेच एखाद फुल..
तर...मुक अश्रुत भिजव

होतील इतर निर्माल्य
एखाद तुझा गजरा
कवितेचा फुलगंध
होईल मग साजरा....

प्रताप
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२९.१२.२०२२


















रितेपण


मी होतो रिता जरासा
घेवून तुझे दुरावे
पानगळीने जैसे येथे
बहरफुलास झुरावे

मी करू कशी आवेगी
आठवांची धुळधाण?
उतरून द्यावे तरूने
जसे शुष्क वाळके पान

मी फुल कोणते लगडू
झाड जणू झुंबरते
गाय जणू पान्हावली
सांयघडी हंबरते

मी गीत कोणते लिहू
जे तुला भारून जाईल
चांद कोणता शोधू
जो तुला धारून येईल

मी हाक कसली देवू
होईल तुला की व्याकुळ
बासरीने मोहरून जाईल
मग कृष्णसखीचे गोकुळ

मी त्यागु कसा मोह
होऊ कसा मी सन्यांशी
भरू कसे रितेपण
जे साचते हृदयापाशी...?

प्रताप
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२९.१२.२०२२


Monday, December 26, 2022

निशीगंधी तळवे


या पानसळसळी वेळी
मी स्तब्ध राहू कसे?
की ओटीस तुझ्या बिलगवू
रानातली मोरपिसे?

शांत तळ्याच्या काठी
मी करतो मुक धावा
गीत मनाचे माझ्या
चालते तुझ्या गावा

घे भेट त्या गीताची
शब्द कुशीला घेवून
घे तुझेच रूप बिलोरी
शब्दामधले पाहून

हा अनंतमुखी शोध तुझा
मी गीत पेरतो हळवे
दे निशीगंधास या अर्पुण
तुझे आसुस तळवे!!


प्रताप
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२६.१२.२०२२








Sunday, December 25, 2022

प्रकाश याचना


अंतरीचे तुफान
तरीही जळतो दिवा
ओळखुन सरावलेली
आठवणींची हवा

हवेस चेटूक नित्य
ती मंद गतीने वाहे
दिवा गाभा-यातला
दिपमाळ उसासून पाहे

तमास कसले गुज
नित्य मी करावे?
वात मनाची माझ्या
जळण्यास सरावे

मी काजळीच्या वाटेवरती
स्वप्न लपवू पाहतो
विझल्या वातीवरती तयांचा
काळा डाग राहतो

पुन्हा तिथुनच जळणे
वात थकत नाही
जळणे तिचे अंधारी
चुकता चुकत नाही

का थरारतो नित्य
तुझ्या देव्हा-यातील दिवा?
घे विचारून त्याला...
माझ्या वातीचा प्रकाश हवा?

प्रताप
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२५.१२.२०२२



स्पर्शकळप...


तुझिया आठवणींचा
पहा किती दरारा
क्षण ही निघत नाही
ध्रुवदिशेस भरारा

रातीच्या भिंतीआडूनी
जात्यावर कोण दळते?
मनातली माहेरवाशिण
जणू बापकुटीस हळहळते

अश्रुंनी तलाव सजतो
फुलतात मनात कमळे
पद्मगंधी एकोप्यातुन
मनात पुकार उमळे

रक्ताच्या पल्याडाहून
पुकारती तुला हाडे
पुसट कशाला व्हावेत
प्रेमभुलीचे धडे?

ख्रिस्तसुळावर येती
तुझ्या हाकांच्या वेणा
मी तळव्यावर सजवतो
आठवांच्या सुळखुणा

रंग कोणता असा
मी तमात कालवावा?
तुझ्या स्पर्शाचा कळप
नक्षत्रातुन बोलवावा....

प्रताप
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२५.१२.२०२२





Saturday, December 24, 2022

आभासातल्या उरभेटी


आत्मे विखुरले शब्द
डोंगरमाथी पेरणी
हंगामात का लगडते
फुलास माझ्या झुरणी?

पडवीत वाळके पान
आणतो कुठुन वारा?
दारात शिशिर रेंगाळे
पानगळ बहरणारा

मी पान कोणते वेचू
हिरव्या बहर कथेचे?
की निनाद टिपून घेवू
पडत्या दव व्यथेचे?

धवल दिशेला धुके
उज्वल त्याचा रंग
मी दिर्घ कुशीला घेतो
एकांताचा संग

दुर कुठे ती बासरी
मुकमुक्याने वाजे
राधेच्या लोचनाला
दव शुक्ल साजे

पायरवाचे ध्वनी
पुसट मला का वाटती?
अंधार साचला असता
गाभारी दिवे का पेटती?

ये! दिव्याच्या कवडशा
अंधार बनाच्या दाटी
स्पंदनास ऐकु याव्या
आभासातल्या उरभेटी...

○ प्रताप ○
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२५.१२.२०२२
















शिशिर चंदन


चंदनाचे हात माझे 
घेवू कसे माघारा?
गंधाचा कसा तुला
मग मिळेल धागादोरा?

या स्तबधी रातघडीला
कसले वाहते वारे?
शिशिर वाचवत असतो
पान पहा गळणारे!

केशर दिवे विझले
चंदेरी अंधार सजला
का भास तुझा कवटाळे
हमसून अवेळी मजला?

हे गर्दनिळे घनाचे थवे
अंधार भरून येता
रातीच्या वसंत सावलीला
शिशिर सांगतो कथा

पालवीच्या ॠचा हिरव्या
मग शोधती तुझा आसरा
कुशीसन्मूख आभास
चेह-याचा तुझ्या हसरा

अशा व्याकुळ वेळी 
कविता मला सुचते
एक कविता माझी
अनंत पानगळ वेचते....

○ प्रताप ○
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२५.१२.२०२२


Wednesday, December 14, 2022

दिवेलागणी


दिवेलागणी वेळी
मी काही मागत नाही
अंतःपुरीच्या आतले
गाव त्यागत नाही

गावाच्या वेशीवरती
गोरजधुळ उडते
दुःख कुणाचे हसरे
मनात मुक रडते

देव्हा-याला कसले
प्रश्नांचे पडते कोडे
संन्यस्त भावनेवरती
उडती मोहाचे शिंतोडे

मी मोहही त्यागत नाही
ना होतो मी संन्याशी
हात पसरतो मिटले
तुझ्या काळजापाशी

साचल्या अंधार वेळी
पेटव सांज दिवा तु
दे हृदयास माझ्या यावेळी
 कवडसा एक नवा तु!

○ प्रताप ○
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१४.१२.२०२२






चांदणधाव


नाव तुझे उमटावे
आत्म्याच्या भिंतीवरती
हे चंद्र मनातील माझ्या
अवकाश कडेवर झरती

झरल्या चंद्राखाली
ओल चंदेरी पसरे
पंख चकोरी आर्त
माळावरती घसरे

निनाद त्या पंखाचा
धरणीचा हो दुभंग
नावातील अक्षरांचा
हो हळवा एक अभंग

अभंग शिलेतुन मग मी
पुन्हा कोरावे तुझे नाव
हृदयाच्या नक्षत्र मिठीला
चांदण्याने घ्यावी धाव....


○ प्रताप ○
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१४.१२.२०२२






Sunday, December 11, 2022

गीत हाका-यांचे...


मशिदीच्या घुमटावरती
अजान वेळी पारवा
गर्द धुक्याच्या अंतरी
सांयआरतीचा गारवा

अशा पुकार घडीला
चांद उसासून निघतो
एक कोणाचा देव या
व्यथालयास बघतो

जोडलेले उंचावलेले हात
असे काय मागणे?
देवचाफ्याचे त्यावेळी
एकेक फुल त्यागने

अशा विभक्त घटीकेवर
मी तुझे दान मागतो
अजाण तुझ्या शहरावर
मग चंद्र बनून जागतो

उजेडात या कधी
येईल का अनाहूत चांदणे?
किती युगे चालेल हे
अदृश्य प्रार्थनालयाचे बांधणे?

कोरतो आहे मी शिल्प
आर्त पुका-याचे...
पोहचेल कधी तुझ्या अंतरी
गीत माझ्या हाका-यांचे...??

○ प्रताप ○
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१२.१२.२०२२




शब्द चकोर


लिहू कसले शब्द
काळजास भिडणारे?
जसे काफिले चकोरांचे
चंद्रमुखी उडणारे.....

गाठू कसा मध्य
चंद्र असता पुर्ण ?
उजळून आरास होईल
तम खिडकीतला जिर्ण....


○ प्रताप ○
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
११.१२.२०२२










अवचित सुगंधी होणे


उकलते जरासे
मनात साचलेले
ते अक्षर अंधूकसे
पुसटसे वाचलेले

लयीत पाताळाच्या
चांदण्याचे गात गाणे
उलटून जाती एकेक
मिटल्या पुस्तकाची पाने

हो ना तु ही अनोखी
कविता सुचलेली
काट्यामधूनी अलगद
फुलोरा वेचलेली

असु दे हातास या
सुगंधाचे तुझ्या देणे
जाणू दे मलाही
अवचित सुगंधी होणे..!

○ प्रताप ○
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
११.१२.२०२२






Thursday, December 1, 2022

विसरलेल्या लोककथा

स्वप्नभुमीत रूजते
आठवणींचे रंगीत बिज
अवकाशाच्या चांदणीला
देवून व्याकुळ निज

थवा ढगांचा अंधूक
चांदण्याची लोचने
स्वप्नांचे धागेदोरे
दिठीतुन व्यग्र वेचणे

बंदी त्या पावलांना
श्रृंखला कशी तुटावी?
आसक्तीच्या तळातली
निर्मोहकता कशी सुटावी?

घोड्यांचे थिजले डोळे
हरिणगतीला भिनले
मी वस्त्र कोणते ऐसे
अवघड पळात विणले?

या स्वप्नधाग्यांचे रंगीत
विणलेले भरजारी वस्त्र
वास्तवाच्या मयसभेत या
भाव माझे निर्वस्त्र

काय भारून सांगु
केवड्याच्या मी व्यथा?
तु जपशील ना माझ्या
विसरलेल्या लोककथा?
○ प्रताप ○
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२.१२.२०२२










Tuesday, November 29, 2022

आस्ते....


स्वप्नांच्या झरोक्यात झुरते
तुझ्या असण्याचे कवडसे
दे हातातले रंग तुझ्या
रंगीत स्वप्ना एवढेसे

सरसरत्या भावकल्लोळाचे
तांडे तुझ्या दिशेला
वणवणत्या मुसाफिराला
दे विसाव्यास धर्मशाला

कलती सुर्यकिरणे
रातीचा अंधार शिगेला
मी कवेस लिपटून घेण्या
तु विसरत नाही शेला

कवितेच्या प्रलयाच्या
थोपवाव्या किती लाटा
शब्द हवेत फिरती
होतो ना बोभाटा

मेघावरले रंग उतरती
काळीज गतीच्या भाळी
फुलो-याच्या शिशिर घडीला
वाट विसरतो वनमाळी

येण्याचे तु विसरते
उत्सुक असता रस्ते
मग चांद भुईवर निजतो
हुंदके देत ...आस्ते...


○ प्रताप ○
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
३०.११.२०२२

फुलाचा 'शिण'गार


धुक्यातल्या रानवा-याला
का वाटे केविलवाणे?
अज्ञाताचे हात फिरती
त्यावर मग प्रेमाने

अशा सांजशेजेला
लगडती चंदनफुले
मी हात माझे करतो
कृपाळू मुहूर्तावर खुले

पान एक पडते
आवाज त्याचा कसला?
दुर कुणाच्या चाहुलीचा
मोर रूसून बसला?

पायरवाची लाली
भुईत माझ्या मुरते
सांज सरता तिळतिळाने
धुक्यात रात उरते

उरल्या रातीचे शिल्प
दिसते असे का भग्न?
उदास माझे गोकुळ
राधा कुठे गं मग्न?

सुरावटीचे सुरवंट
फुलपाखरू बनते
वेलीच्या आत्म्यावरले
फुल उसासून शिणते....

○ प्रताप ○
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२९.११.२०२२





Monday, November 28, 2022

थिजला...

अंधार ओसंडून सरतो
समई जळत असता
मी तरीही अडून असतो
सारे कळत असता

स्तब्ध हवा तरीही
चाहूल तुझी अंतरी
आत्म्याचे राऊळ हे
कोण पुजारी मंतरी?

हा कोणता विधी
अन् कोणती आराधना?
जिवाआड जतावी
तुझी खोल वेदना....

मोतियाच्या आभाळाला
चांदण्याचे शुभ्र चटके
मी आभाळ कसे धरावे
मुठीत माझ्या भटके?

मी हात उंचावले माझे
दे फुलांचे दान मजला!
मागणीच्या आभासाने
तुझा चंद्र बघ थिजला!

○ प्रताप ○
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२८.११.२०२२











Sunday, November 27, 2022

मंतर...


अंबर भरास येता
मोरपीसाचे गडद रंग
हृदयात लांडोराच्या
गरजती प्रेम अभंग

येता धावून बरस
मी कंच ओला होई
सुर बासरी धनभारी
पेरते अपुर्वाई

राधेची ओढ पसरते
होते सारे व्याकुळ
जळात वाहत असता
लाटामधूनी गोकुळ

उचलावे किती पर्वत
बरस रोखण्यासाठी?
होतील कधी अवकाशी
नक्षत्रांच्या गाठीभेटी ?

की लागते निघावे
स्थापन्या दुर द्वारका?
की व्हावे अवकाशातील
मुक..दुरवरची तारका..?

आस संपत नाही
कसे मिटावे अंतर?
दे ना पायरवातुन
या दिठीस एक मंतर..

○ प्रताप ○
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२८.११.२०२२









Saturday, November 26, 2022

ओथंब...


मी वृत्त कोणते घेवू
शब्द तुझे गुंफाया
चांदणे तुझ्या छवीचे
या रातीवर शिंपाया

भाकितांची लागवड मी
करू कशी आभाळी?
हे वर्तमान हुरहुरीचे
धारू कसे मी भाळी?

डोहाच्या काठावरती
दंतकथा हळु विसावते
हे कोण असे काठांना
लाटातुन फसवते...?

संधेला वाणी नसते
त्यावेळी कोण गाते?
चांदण्याचे वस्त्र रूपेरी
चंदेरी तम होते

घरटे रिते लटकते
एकट झाडावरती
पाखरजोडीच्या चोची
ॠचा पहा पाझरती

त्या पाझर ॠचेखाली
मी शब्द माझे भिजवतो
डोहाच्या काठावरती
मी ओथंब का सजवतो?

○ प्रताप ○
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२६.११.२०२२




Friday, November 25, 2022

रिती फांदी....

समयोचित अवरूध्दास
मी शरण जात नाही
आठवांचेही कदापी मग
क्षरण होत नाही

झुंजत असता पळांशी
मी ही अनावर शिणतो
तरीही कोण पक्षी
फांदिवर गुणगुणतो?

मोजत एकेक नक्षत्र
मी तुडवत चांदणवाटा
संथ नदीतळातल्या
थोपवत उन्मळ लाटा

मुक मनाने गातो
पक्षाचे राहिले गीत
व्याकूळ फांदिवरती
रितेपणाचे संगीत

झेपावून पंख तो
कुठल्या दिशेस जातो?
त्या पक्षाच्या आठवणीने
मी रिती फांदी होतो....

○ प्रताप ○
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२५.११.२०२२







Thursday, November 24, 2022

आकांत...


मी व्याकुळ संध्याकाळी
गीत तुझे रचताना
वेचत असतो बहर
तु उमाळून सुचताना

लागते हातास धुके
जणू काहीच स्पष्ट नसते
तरीही गीत माझे
मंद सुरातुन हसते

कसला हट्ट त्याचा
भाव सुटत नाही
तार त्याची हृदयी
तुटता तुटत नाही

मी गीत मुक्याने लिहतो
ओळख मिटवत नाही
तुझ्या बहराचे धुके
हातुन सुटता सुटवत नाही

हसते मजवर सांज
मी राहतो मुका शांत
कळेल कधी का तुला
माझ्या गीतातला आकांत?

○ प्रताप ○
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२४.११.२०२२

साजनवेळ....


तुझ्या चरणगतीचे गीत
फिरते माळरानी
गवताचे हृदय असे का
होते आबादानी?

खुडून घेवू कशी
मी हवेतली उदासी?
प्रार्थना रेंगाळते माझी
तुझ्या एकट वेशीपाशी

माझ्या साजनवेळेचे
काढत कधी माग
येईल का अनाहूत
हृदयास तुझ्या जाग?

नकोत मला तुझ्या
शहराचे धुकेरी सोहळे
मी गवत फुलांचे हृदय
जपेन रंगीत कोवळे.....


○ प्रताप ○
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२४.११.२०२२





Wednesday, November 23, 2022

प्रतिक्षा....

मी काय लिहू असे?
शिळेस फुटेल प्राण
तुझ्या रघुकुलाला
वचनाची राहो जाण

नियतीचे ओलांडत फेरे
येशील कधी का वनी?
राखशील लोककथेची
रित पावन जुनी?

असेच पडले सारे
अनंत काळ सरले
पाषणपणाच्या अंतरी
आता आहिल्यापण उरले

कशास वचन द्यावे?
वनवासी न बनता
किती युगे प्रतिक्षा?
पहावी न शिणता?


॰प्रताप °°
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२३.११.२०२२







Tuesday, November 22, 2022

वादळाची दुर्दशा...


मन उन्मळे सखे!
झंझावात तुझे येता
श्वासांनी भरून येतो
हृदयाचा हळवा भाता

स्वप्नांच्या पारंब्याचे
झाड कसे बघ हलते
तुफान तुझ्या आठवांचे
मुळास त्याच्या सलते

तरीही रोवून उभा हा
बहराची फुलवत आशा
त्यास बघवत नाही तुझ्या
पराभूत वादळाची दुर्दशा!!



॰प्रताप °°
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२२.११.२०२२






वाटते....


मंदावत्या सांजेस सखे
देवू उजेड कुठला?
आठवणींच्या पायरवाने
कवितेस टाहो फुटला

मी शोधतो शहराचा
हुरहूरता एकट आत्मा
कैफात तुझ्यातला
पुकारतो परमात्मा

हवेच्या पाउलखुणाही
शोधती धुकेरी वाटा
मुक निःश्वासाचाही
निनाद व्यापक मोठा

मी पेरतो हवेवर
आळवणीचा सुर ओला
ये तमाच्या काळजावर
चांदण्याचा उजेड घाला

चांदण्याच्या शितप्रकाशी
सारे रान पेटते
टिमटिमते चांदणे मग
ओंजळीत हसावे वाटते

॰प्रताप °°
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२२.११.२०२२


Sunday, November 20, 2022

युक्ती


चांदण उगवतीच्या मुहूर्ती
डवरती शब्द फुले
हृदयाच्या हिंदोळ्यावर
तुझे आभास झुले

सुर्याचे काळीज केशरी
धरतीच्या कुशीत चालले
ढगांच्या अंतःकरणाला
कोण गुलाल लावले?

ओढ कसली दाटते
निनादत असता हाक
चेह-यास तुझ्या का यावी
नजरेची माझ्या झाक

असल्या व्याकुळ वेळी
अस्पर्शि कसा राहू?
भुगर्भातील झ-यासम
कुठपावेतो मुक वाहू?

दे ना उगम मजला
मिळू दे एकदा मुक्ती
देवून टाक या प्रवाहास
सागराची व्याकुळ युक्ती..
॰प्रताप °°
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२०.११.२०२२





Saturday, November 19, 2022

फुलांचे हसणे...


खालमानेने गळताहेत फुलं
हा निरव बहर फुलोरा
गंध उडे आसमंती
शोधत वेल सहारा

झळाळतो रंग कसला
गळतीच्या वेलीखाली
मातीतल्या पाकळ्यांना
नसते कोणी वाली

पायदळी हे कसले
सांडून जाते लेणे
दुःख घेवून अंगी
हुरहुरनारी पाने

थरथरणारी वेल आणीक
झरझरणारे वारे
व्याकुळ निरोप घेती
वेलीवरून सारे

सांडल्या पाकळ्याचे
मी घेवून सुगंध उसने
शोधत असतो वेलीवर
फुलांचे निष्पाप हसणे...

॰॰प्रताप °°
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१९.११.२०२२




Friday, November 18, 2022

काय...?


मी काय अर्पावे तुला
अंतरातले माझे?
विरून जाईल म्हणजे
हृदयावरचे ओझे

मी काय व्हावे असे
तुझ्या समीप असणारे?
मिटल्या डोळ्यांनाही
सुस्पष्ट दिसणारे

मी काय घडून यावे
तुला हवे वाटणारे?
एकांतघडीच्या वेळी
अनाम मनी दाटणारे

मी काय असावे असे
जे तु प्रार्थनी मागावे?
झोपाळल्या रातीतही
चांदण्याने जागावे.....

✿ प्रताप ✿
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१८.११. २०२२

ग्वाही


अपुर्णतेचे भान घेवून
पुर्णत्व गाठताना
वाहत्या शब्दाखाली
भाव बनून गोठताना

क्षणभर थांब .....
रिकामी ओंजळ पसर
होऊ दे शब्दावर
भावकल्लोळी असर

त्यांना तोल हृदयी
दुरवरून कवितेस पहा
तिच्या एकल आत्म्याला
माझा देवचाफा वहा

घे सुगंधवा-याचे ठसे
कवितेला रंग दे
आकारहीन आठवणींना
तुझे भाव अंग दे

होवू दे शब्दांना
तगमगीचे स्पर्श
घे रेखाटून जिवावर
सृजनाचे अस्पर्शि हर्ष

कवितेच्या अस्तित्वाला
नकोस विचारू काही
भाव देतील आपोआप
समर्पणाची आर्त ग्वाही

◦•●◉✿ प्रताप ✿◉●•◦
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१८.११. २०२२









Thursday, November 17, 2022

शिणला


तुझ्या सावलीचे गाव
उजेडाचे मंद दिप
मी आतल्या खोल तुला
का शोधावे समीप?

तुझ्या सहवासाचे आभास
वास्तवातले दुरावे
हवा घेवूनी कुशिला
किती किती मी झुरावे?

तुझ्या मनातले गीत
शब्द यावा कसा ओठी?
कसे घेईल आभाळ
धरतीच्या गाठीभेटी?

तुझ्या घराच्या वाटा
चोरती का असे अंग?
का बांधतो हा जिव
तुझ्या वाटेचा हा चंग?

तुझ्या जिवाची काहिली
आग पेटते मनाला
उसासून एकोप्यात
जिव अभागी शिणला....

◦•●◉✿ प्रताप ✿◉●•◦
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१७.११. २०२२







Monday, November 14, 2022

झाड कुळाचे


येते असे काही बागडत
मनाच्या रस्त्यावरती
ठाण कोरड्या नयनांनाही
जणू हुरहुर भरती

नसतो सोस तरीही
इच्छा असते दाटून
क्षणात निर्वाताच्या
जाते क्षणभर वाटून

तु यावे कुशीच्या गावा
हिरवा माळ व्हावा
तुझ्या तल्लीन आळवणीत
जिव माझा टाळ व्हावा

सुर भिडावे आकाशी
अवघेची भरून यावे
दुरवरचे एकट पाखरू
पुन्हा फिरून यावे

द्यावी त्याने खुशाली
तुझ्या गोंदण खुणांची
मी व्हावे एक कविता
तुझ्या व्याकुळ मनाची

मी टिपून दव घ्यावे
तुझ्या गवत पात्याचे
तु अनूभवावेत रंगीत
ऋतु आपल्या नात्याचे

मी फुल व्हावे सुगंधी
तुझ्या झाड कुळाचे
आणी चैतन्य व्हावे
गढल्या खोल मुळाचे...

◦•●◉✿ प्रताप ✿◉●•◦
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१४.११. २०२२



Sunday, November 13, 2022

अर्ध्य...


नदीस येतो हुंदका
ती वळणावरती सोडे
मी दोन्ही काठांना मग
घालत बसतो कोडे

ओल्या गवतजुडीवर
मी सोसत असता आग
जळातल्या पाणतळाला
मग हलकेच येते जाग

मी काही बोलत नाही
ओल्या गवत फुलांना
अर्ध्य देवून निघतो
झाल्या चुक भुलांना...

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१३.११. २०२२

Saturday, November 12, 2022

मुक्तीच्या बदल्यातही...


नक्षत्र रेखण्यासाठी
मी हात तुझे मागतो
काजव्यांचे थवे होवून
फुलअस्तरी जागतो

तु उगवत नाहीस नभी
चांदण्याचे घेवून रूप
मी धुनित आठवणीच्या
समर्पी हाकांची धुप

मी गातो अनामिक स्त्रोत
करत तुझा धावा
मी कृष्णकुळातील सुरांचा
होतो व्याकुळ पावा

मी मांडतो सारे संगतवार
तु चुकून येत नाही
पावत नसते अनुष्ठान म्हणत
मनावर ही घेत नाही

तुझा देव तुला पावो
मी काही मागत नाही
मुक्तीच्या बदल्यात ही
तुला त्यागत नाही

नको मला काही
तरी नसते व्यर्थ पुजने
ठरते का हर साली
मग धरतीनेही सजने??

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१२.११. २०२२





Friday, November 11, 2022

सलते....


बिज आपल्या
स्वप्नांचे खजिने
मातीखाली लोटून
मुकपणे झेलते
वापश्याचे घाव...

फुललेले दुःख
गंधीत होवून
इवलेसे झेपावते
आभाळदिशेस रोपटे
बहर त्याचे का नाव?

ते फुलते
ते खुलते
काट्यास बिलगुन दुःख
आकंठ असे का
सलते....??

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
११.११. २०२२











काही वाटत नाही..??


मी टिंब टिंब जोडत
येतो रेखत रेषा
तु धुसरत पायखुणा
खोडत निघते भाषा

मी एक एक शब्दांचे
कसे बांधू सेतु?
सांधू कसे तुझ्या मनाचे
अरण्यकी गर्त हेतू?

सारून सारी मृदा
वृक्ष कसा उगवावा?
बहर मनातील एकट
असा कसा तगवावा?

नकोस बोलू काही
सारे मजला कळते
अंधार दाटला असता
दुःख एकले जळते

तु नकोस घालू बांध
धारेस मुक्त वाहू दे
घे सामावून माझे असणे
सागरा स्थिर राहू दे

सागर निघत नाही
तो सोसत एकला उभा
नदीस विलीन होण्याची
देत मुक मुभा

नकोस मोडू दिशा
रस्ता भेटत नाही
या भांबावल्या रातघडिचे
तुला काही वाटत नाही...??

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१०.११. २०२२












Wednesday, November 9, 2022

एक हसरे...

शुभाशिषी फुलपाखरू
रमते तुझ्या फांदी
कुठल्या फुलबहराची
पंखात निनादे नांदी

धुंद कुंद कळीतले
सोने कसे जतावे?
पापण अस्तरातले
स्वप्न अनाहूत फितावे

लागे जिवास छंद
अश्रुबिंदूच्या तळी
काळजावर उमलताना
तुझ्या भासाची खळी

मन दमून शोधते
तुझ्या फांदिचे आसरे
मग स्वप्नांचे फुल उमलते
मनात एक हसरे

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
९.११. २०२२


Tuesday, November 8, 2022

कर्ण...


माझ्या अंतर्मुख असण्याला
तुझे संदर्भ नसण्याचे
मी गहिरे दुःख धुळाक्षरी
झुळुकीगणीक पुसण्याचे

मी भास गुढ असंभाव्य
मी उगाच उगवला तारा
अंधार तुझ्या पदराचा
दाटून अंतरी ढळणारा

तु अप्राप्य चांदणमंडल
नभी अवचित उगवणारे
अंधार दाटल्यावेळी
नवआस तगवणारे

तजेलदार फुलांचा मी
राजवर्खी असहज वर्ण
तुझ्या आठवांच्या चाकांशी
झगडणारा मी कर्ण....
प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
८.११. २०२२





Sunday, October 23, 2022

मुक दुवा..




चिमणी येते
माळ हसतो
रान फुलावर
रंग दिसतो

हितगुज होते
बहर फुलतो
पंख रंगात
माळ झुलतो

संगत होते
मन जडते
चिमणीचे सख्य
माळाशी जडते

अचानक चिमणी
उडून थवा होते
माळावरची मातीही
मग मुक दुवा होते......

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२४.१०. २०२२







रचनापर्व

Wednesday, October 19, 2022

नकोस....


मी धुसर होऊन असा
गडदाऊ कसे रंग?
ढगास कुठल्या देवू
परतोन्मुख तरंग?

डोंगराची एकट माळ
गाईल गीत कसले?
स्वप्न तुझे शिखराचे येथे
उशास माझ्या बसले

बुडणा-या किरणांचे
कसे गाठू मी मुळ?
की उधळू अवकाशी
थव्यापंखातली धुळ

उजेड हृदयाचा देऊ
की होऊ तमाची छाया?
नकोस पाठवू स्वतःतल्या
स्वतःस मला भेटाया....

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२०.१०. २०२२






Sunday, October 16, 2022

बहराचा जोगी

अस्तचलाकडे बहर
निघता निःसंकोची
दुःख पाझरते मुक
फुलखुडीच्या जागी

गवत मुळातुन
पुन्हा बहरतो
वसंतवैभवाचा
रंगीत जोगी.....

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१६.१०. २०२२



Friday, October 14, 2022

पाऊस परतीचा


नसतो कधी कधी
पाऊस सखा धरतीचा
मग ढगास होणे होते
पाऊस परतीचा.....

देवून सारे निघतो
नसते कसली घाई
धरती अनूभवताना
नवॠतुची हिरवाई

दरवेळी असाच तो
उसासून सारे देतो
हंगामाच्या शेवटी
तो परका परका होतो

गुमान जातो निर्वाती
पायरव न करता
क्लांत निरभ्र होतो
धरतीची ओटी भरता

येईल हाक फिरूनी
पुढच्या ॠतुच्या घडी
तो पावेतो पाऊस माझा
देईल काळीज दडी

झालाच जिव उष्म
माग कधी तु धारा
मी होईन तुजसाठी
पाऊस बरसणारा........

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१५.१०. २०२२




Tuesday, October 11, 2022

बहर वरदान


तुझ्या शहरावर धुके येते
झाकाळली संध्या होते
ढगांना अजाण हुरूप येतो
कुंद फुलवेलींना बहराची
फुलमिठी पडल्याने
कदाचित मोरही
जंगलकपारीत
दगडफुलावर
पेरत असतील गाणे
आणी रिमझिम थेंबाच्या
मृदू स्पर्शात उमटले मोहोर..
माती उधळतही असेल
रानावनावर...
पण दुर खोल जंगलात
एखादी देवबाभुळ
हळदकणातुन उत्सुक असेल
अंधारल्या ढगास
स्वर्णकण बहालीस...
कधी वळतील का तुझे पाय
जंगलवाटा तुडवत?
खोल जंगलातील
झाडांनाही असते बरं
बहराचं वरदान!

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१२.१०. २०२२

Monday, October 10, 2022

सुरेल गीत

बेहिसाब आठवणीस
विसरण्याची असेल का
एखादी रस्म?
हृदयात ही कंपने
स्थिरावत
कुठला ख्यालाची
लोकगीते म्हणू मी ?
एकाकीच कसा पार
पाडू मी हा
आदिम यातुविधी?
ध्वनीत एकात्म
होण्यासाठी
मी विस्कळून
टाकतो आहे
सप्तसुर..
                        आणी हे एक⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀
फुलपाखरू
कुठुन तरीही
घेवून येत आहे
सुरेल गीत?
🦋˙˜”*°•.
༊प्रतापॱ⋅.˳˳.⋅ਏਓ ઇଓ
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
३.१०. २०२२



Sunday, October 9, 2022

चंद्रज्योती



चंद्र आला सखे!
उजळत तुझी काया
अंथरली मी ओंजळ
आभा तुझी धाराया

उजळ चंद्रज्योतीतुन
मोतीपवळ्याच्या राशी
तुळसमंजिरी हसते
दिवेलागणी दाराशी

ये! सारेच उजळत असे
तम सोनधुके भासावा
चकोर व्याकुळ होवून
चेह-यास तुझ्या ध्यासावा

शुभ्रधवल ढगाला
जसे लाभले सोने
उजळून दे समग्र
जगण्याचे गडद कोने....

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
९.१०. २०२२




Friday, October 7, 2022

रेषा...


सायंतारा सांजवेळी
शोधतो नभात 'ओरवा'
मनात भरून येतो
आठवणींचा मारवा

तु मी जरी मिसळलो
नभात उमटते रेषा
दिवसात मिसळण्यापासून
वंचीत राहते निशा

सांजेचा धुसर पुल
एकमेव आपले सांधण
शब्दात माझ्या उतरते
तुझे नक्षी गोंदण

ओलांडावा कसा
या परिघाचा फेरा?
धरतीस कसा बिलगावा
दुर नभीचा तारा?

जळतो दिवा तरीही
अंधार साचून येतो
हा बाण कसा जिव्हारी
हलकेच टोचून जातो

मी राखतो तरीही
तु आखली लक्ष्मणरेषा
आस पाठवून देतो
तु नसल्या दुरदेशा....


प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
८.१०. २०२२












आत्मभानाचे अर्पण


माझ्या शब्दावर तुझे
आभाळ उतरून टाक
कवितेला येईल मग
तुझी धुसर झाक

शब्दांची धरपकड कर
त्यातले अर्थ शोध
होईल तुला गर्त मग
व्याकुळ अर्थबोध

निशीगंधासम मोहोर
पुन्हा बहरून ये
माझ्या गावाच्या कवितेत
मनसोक्त विहरून ये

राती निजेस जाता
कवितेने कुशी उजव
माझ्या शब्दांना मग
ओल्या आठवांत भिजव

शब्दांचे पोत तपास
पाहूनही घे जडण
हाती तो तो लागत जाईल
तुला तुझीच घडण

नि:श्वास,हुंदक्याने
सिंचीत रहा हे रान
माझी कविता बहरेल
तुला अर्पित आत्मभान...

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
८.१०. २०२२












तमशलाकेत....



या उजेडभासी राती
तळे निजत नाही
ही कसली धुनी अंतरी
विझता विझत नाही

या तमशलाकेत रूतते
चांदण्याची हाक
चंद्रास ही बिलोरी
तुझ्या नयनाची झाक

अवगुंठते वा-याची
वाहण्याची भाषा
अंधारावर तुझ्या
ओढ आभाळाची रेषा

रेषेच्या रोखाने
गाठ तु टिंब
तळाशी साचलेले
पुर्ण चंद्राचे बिंब

सारे सारे तपशील
देती तुला हाक
कवितेला माझ्या
तुझ्या चांदण्याची झाक

उभे कशासाठी कोण?
देत उजेडाचे दान
माझ्या शब्दांना पुकरते
तुझी मुक मुक आण

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
७.१०. २०२२










राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...