Saturday, January 24, 2026

तग धरले पर्ण



शेवटचे तग धरले पर्ण
भेटेल वसंता ऊरी
देईल त्यास सस्नेह
पर्णगळीच्या हूरहूरी 

ते मोहोर रंगीत नवे
आणी टवटवीत पाने
त्यांचे अतूट प्रारब्ध 
ते मूक एकले जाणे

काट्याच्या अणीवर
कोसळता प्राजक्त सडा
गेल्या वसंतानंतर त्याने
शिकलेला हा धडा!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com








No comments:

Post a Comment

तोडून...?

गोकुळ निघाले मथुरा अनाथ झाल्या गायी राधा हृदय चालले कृष्ण दिशेने पायी येईल परतून कान्हा देईल हाक हासरी? की थेट वृंदावनी मूक्ती तोडून प्राणप्...