Wednesday, January 7, 2026

पिळ



तोडून पिंजरा पक्षी
गाठेल कोणते गाव?
घेईल कशाला कोणी
वेशीवरती धाव

ही कैद आठवांची
वाटते त्याला खिन्न
अवकाश त्याच्या पंखाचा
मूक एकला सुन्न

येईल कधी हवेवर
एक हसरी शिळ
पक्षी हसून घेईल 
दडवून दुखरा पिळ!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...