Friday, January 30, 2026

निपचित



देवधानाच्या मूठी
नको टाकू रानी
थव्याची लागतील
मग ऐकावी गाणी

आंब्याचा डहाळीचा
नको उभारू मांडव
येतील नजरेस
अज्ञातवासातील पांडव

लावून दिवा तू
नको म्हणू संध्यागीत
चांद पूनवेचा येवो
दर्या राहील निपचित!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com





No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...