Tuesday, January 6, 2026

हंबरी



गेल्या किती दिवसांचे
हिशोब जूळत नाहीत
पाय जडावून हंबरी
माघारा वळत नाहीत 

तू सोडल्या गायांचे
रस्ते नकोस मिटवू
सांग या पान्हयाला
कसे वासरू भेटवू?

विसरून कसे सुखी
कुणी द्यायचे हाळी?
अवरूद्ध साचून हंबर
या भारावल्या गळी......


₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com




No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...